3 members of Keli Gram Panchayat declared ineligible esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : केळी ग्रामपंचायतीमधील 3 सदस्य अपात्र घोषित; सरपंचपदही आले धोक्यात

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : नवापूर तालुक्यातील केळी ग्रामपंचायतींतर्गत चालू पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले नीलेश पारत्या गावित, जोशदा सवलत गावित, सुंगती जितेंद्र वसावे यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी मनीषा खत्री व नाशिक अपर आयुक्त यांनी अपात्र घोषित करण्याची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे केळी ग्रामपंचायतींतर्गत खळबळ उडाली आहे. (3 members of Keli Gram Panchayat declared ineligible nandurbar news)

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ज) ३ प्रमाणे विवाद अर्ज दिलवरसिंग नाग्या गावित, मगन वश्या गावित, नरेंद्र गोरजी गावित, विष्णू संपत गावित, रमेश छगन वसावे, प्रवीण ठाकरे गावित (सर्व रा. केळी, ता. नवापूर) यांनी प्रतिवादी ग्रामपंचायत सदस्य नीलेश पारत्या गावित, जोशदा सवलत गावित, सुंगती जितेंद्र वसावे यांच्याविरोधात शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करत अर्ज दाखल केला होता.

यावर ग्रामपंचायत विभागांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी २९ जुलै २०२२ ला सदस्यांना अपात्र घोषित करत निकाल जाहीर केला होता. अपात्र घोषित झालेल्या सदस्यांनी नाशिक अपर आयुक्तांकडे अपील अर्ज दाखल केला होता; परंतु २९ मार्च २०२३ च्या सुनावणीदरम्यान नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविलेल्या सदस्यांचा अपील अर्ज फेटाळत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १६ निकालाच्या सूचनापत्रानुसार अपील अमान्य करत तिन्ही सदस्यांचे पद अपात्र घोषित करण्यात आले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पुन्हा निवडणूक?

शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून निवडणूक लढवून सदस्यत्व प्राप्त केलेल्या केळी ग्रामपंचायतीमधील नीलेश पारत्या गावित, जोशदा सवलत गावित, सुंगती जितेंद्र वसावे या सदस्यांचे पद अपात्र घोषित केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यातील एकजण उपसरपंचपदावर होता.

अपात्र झालेल्या सदस्यांचे पॅनल मोडकळीस आल्याने सरपंचपदही धोक्यात आले आहे. आता प्रशासनातर्फे केळी ग्रामपंचायतींतर्गत पुन्हा निवडणुका घेऊन अपात्र सदस्यांच्या जागी नवीन सदस्य निवडण्याची प्रक्रिया पुढील शासकीय सूचनेप्रमाणे राबविण्यात येणार आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ARG vs Austria : लिओनेल मेस्सीचा विश्वविक्रमी गोल पाहिलात का? ज्याने अर्जेंटिनाला Fifa World Cup च्या पुढील फेरीत पोहोचवले Video Viral

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

SCROLL FOR NEXT