arrested esakal
उत्तर महाराष्ट्र

अश्लील व्हिडिओ करून १४ लाखाची मागितली खंडणी

तुषार महाले

शहादा (जि. नंदुरबार) : म्हसावद येथील एका नोकरदारास अश्लील व्हिडिओ कॉल करून त्याची रेकॉर्डिंग करीत बदनामी करण्याची धमकी जाळ्यात फसवून त्याचा कडून लाखोंची खंडणी मागणाऱ्या एका महिलेसह पोलिस कर्मचारी व तथाकथित पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी तिघांना अटक झाली आहे.

शहादा पोलिस ठाण्यात अश्लील व्हिडिओ कॉल करणारी महिला, तथाकथित पत्रकार अतुल रामकृष्ण थोरात (चौधरी वय- ५० रा. दत्त कॉलनी, कोरीट रोड, नंदुरबार) व पोलिस कर्मचारी छोटू तुमडु शिरसाट (वय ४६, रा.सदाशिव नगर, शहादा) यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. त्या तिघांना अटक करण्यात आली आहे.

तक्रारदाराला अनोळखी महिलेने भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र तक्रारदाराने यास नकार दिल्यानंतर संबंधित महिलेने तक्रारदाराला व्हिडिओ कॉल केला. अश्लील चाळे करून व्हिडिओ रेर्कोडिंग केली. यानंतर संबंधित महिला आणि पोलिस आणि तथाकथित पत्रकाराने १४ लाखाची मागणी केली. त्यातील नऊ लाख रुपये पोलिस कर्मचारी छोटू शिरसाट यांच्या मार्फत महिलेने मिळविले. त्यानंतर अतुल थोरात याने तक्रारदाराकडे ९ लाखाची मागणी केली.

"अशा प्रकारचे अश्लील व्हिडिओ कॉल करून व बदनामी करण्याची भीती दाखवून खंडणी मागण्याचे प्रकार ज्या नागरिकांसोबत झाले असतील अशा नागरिकांनी कसलीही भीती न बाळगता समोर येऊन पोलिस ठाण्याला तक्रार द्यावी. तक्रारदार यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल."

-पी.आर. पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक, नंदुरबार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : पंतप्रधान मोदींनी नवरात्रीनिमित्त दिल्या शुभेच्छा

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

Navratri Festival : आदिमायेच्या उत्सवाला प्रारंभ;घटस्थापनेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत मुहूर्त

Tuljabhavani Temple: तुळजापूरला नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण ;तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज घटस्थापना

SCROLL FOR NEXT