Police officers and teams present with seized goods from the loot. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : वाहनांसह 39 लाखांचा मुद्देमाल जप्त; तालुका पोलिसांकडून 24 तासांत छडा

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : तालुका पोलिसांनी शिरूड (ता. धुळे) चौफुलीवरील रस्तालुटीचा अवघ्या काही तासांत छडा लावला. बुधवारी (ता. १) सायंकाळी पाचच्या सुमारास लुटीची ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला जेरबंद केले.

दोन वाहनांसह ३९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.(39 lakh worth of goods including vehicles were seized by district Police dhule crime news)

रवींद्र वसंतराव देशमुख (रा. रिधोरा, ता. बाळापूर, जि. अकोला) बुधवारी मेहुणबारे येथून ३३ लाख पाच हजार ९३३ रुपयांचा शेतीपयोगी औषधांचा माल घेऊन धुळे-चाळीसगाव रोडने धुळ्याकडे येत होते. त्यादरम्यान सायंकाळी पाचच्या सुमारास शिरूड (ता. धुळे) चौफुलीवर पुलाच्या पुढे एका स्विफ्ट डिझायर कारमधील (एमएच १८, ६७०८) तीन ते चार जणांनी पिक-अपला (एमएच ३७, जे १९९१) थांबविले.

आम्ही फायनान्स कंपनीचे आहोत, तुमच्या बोलेरो गाडीवर हप्ते थकीत आहेत, म्हणून ही गाडी धुळे येथे फायनान्स ऑफिसला घेऊन जावी लागणार असल्याचे सांगत चालक रवींद्र देशमुख याला शिवीगाळ व मारहाण करीत त्याच्यासह सोबतच्या एकाचा मोबाईल व पैसे बळजबरीने हिसकावून घेतले. तसेच पिक-अप व त्यातील शेतीपयोगी औषधांचा माल जबरीने हिसकावून चोरून घेऊन गेले.

रवींद्र देशमुख याने घटनेची माहिती तत्काळ डायल ११२ वर दिली. त्यानुसार धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, दीपक धनवटे, नितीन चव्हाण, किशोर खैरनार, प्रवीण पाटील, दगडू कोळी, कुणाल पानपाटील, उमेश पाटील, विशाल पाटील, मुकेश पवार, सुरेंद्र खांडेकर, राजू पावरा, नंदू चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

तक्रारदाराला लुटारूंबाबतची माहिती विचारून चोरीस गेलेल्या वाहनाच्या क्रमांकाची माहिती घेऊन पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांना घटनेची माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनात तपास पथकाने अवघ्या चोवीस तासांत घटनेचा छडा लावला.

जापी (ता. धुळे) शिवारातून घटनेतील एक संशयित व चोरीस गेलेले सहा लाखांचे पिक-अप वाहन तसेच ३३ लाख पाच हजार ९३३ रुपयांचे शेतीपयोगी औषधे, रोकड आणि घटनेत वापरलेली कार असा ३९ लाख पाच हजार ९३३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT