The last selfie taken by Kiran Ahirrao with friends on Monday morning before the accident in Malsane Shivara. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Accident News : अखेरचा सेल्फी अन्‌ काळाचा घाला...! भीषण अपघातामुळे कुटुंबीयांसह धुळे जिल्हा सुन्न

सकाळ वृत्तसेवा

Dhule Accident News : मुंबई- आग्रा महामार्गावरील मालसाने शिवारात (जि. नाशिक) सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात धुळे शहरासह लगतच्या अवधान येथील चौघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना वाऱ्यासारखी पसरताच जिल्हा सुन्न, तर चौघा मित्रांच्या कुटुंबीयांना धक्का बसून शोक अनावर झाला. अपघातापूर्वी काही अंतरावर मित्रांसह भाजपचे नगरसेवक किरण अहिरराव यांनी सेल्फी घेतला. तो त्यांचा अखेरचा आनंददायी क्षण ठरला. नंतर होत्याचे नव्हते झाले.

घटनेत नगरसेवक अहिरराव, कंत्राटदार अनिल पवार, शिक्षक कृष्णकांत मोरे ऊर्फ बाबा सर, अपघातग्रस्त कारचे चालक तथा खासगी वाहन चालक प्रवीण पाटील ऊर्फ खंडा आप्पा यांचा करुण अंत झाला. या घटनेमुळे जिल्ह्यात शोक प्रकट झाला. (4 friends died in accident with container dhule accident news)

ही घटना अतिशय दुःखद असून नगरसेवक अहिरराव आणि तिघा मित्रांना सद्गती देवो, अशी भावनेतून खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिल्लीहून श्रद्धांजली अर्पण केली.

अहिरराव कुटुंबाला धक्का

नगरसेवक अहिरराव हे उच्चशिक्षित कुटुंबातील सदस्य होते. वडील उपजिल्हाधिकारी, त्यांची मोठी बहिण अलका अहिरराव जलसंपदा मंत्रालयात अवर सचिव, दुसरी बहिण राजश्री अहिरराव या नाशिकला तहसीलदार, तिसरे भाऊ किरण अहिरराव, चौथे लहान भाऊ डॉ. महेश अहिरराव, असे हे कुटुंब. स्व. किरण यांच्या मोठ्या मुलाने पुणे येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. लहान मुलगा दहावीत आहे. अभियंतादिनी अलका अहिरराव यांचा ५० वा वाढदिवस धुळे शहरातील हॉटेलमध्ये कुटुंबीय व आप्तेष्टांच्या उपस्थितीत पार पडला.

नंतर नगरसेवक अहिरराव बहिण अलका यांना त्याच दिवशी रात्री इंदूर विमानतळावर सोडण्यासाठी गेले. तेथून ते अवधान व आर्वीत (ता. धुळे) गेले. तेथून तिघा मित्रांसोबत ते स्वीफ्ट कारने दुपारी मुंबईत उपचार घेत असलेल्या मित्राला पाहण्यासाठी निघाले. रात्रीच पुन्हा धुळ्याकडे ते भरधाव निघाले. सकाळी चौघे मित्र मालसाने शिवारात पोहोचले. तेथे कंटेनरला मागून धडकून त्यांचा अपघात झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तत्पूर्वी, अपघाताच्या काही अंतराअगोदर तिघा मित्रांसोबत किरण अहिरराव यांनी सेल्फी घेतला व तो नातेवाईक, मित्रांना व्हायरल केला. त्यांना पुढे काळाचा घाला पडेल, असे वाटलेही नसेल. सेल्फीत बाबा सर बाय- बाय करताना दिसत होते. तो कायमचाच ठरल्याने आणि सेल्फीने चौघा मित्रांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का दिला आणि ते शोकसागरात बुडाले.

हरतालिकेचा दिवस

सोमवारी हरतालिकेचा दिवस असल्याने लवकर घरी पोहोचण्याचे चौघा मित्रांनी ठरविले होते. बाबा माळी सर हे मोघणचे (ता. धुळे) तर सध्या धुळे शहरात यशवंतनगरात राहात होते. त्यांच्या वडिलांनी मोघणला शिक्षण संस्था स्थापन केली. त्यात ते शिक्षक होते. तसेच मोघणचे माजी उपसरपंच होते. खंडा आप्पा चांगल्या रीतीने ड्रायव्हिंग करायचे म्हणून त्यांना सोबत घेतले. अनिल पवार हे कंत्राटदार होते.

भाजपचे नगरसेवक अहिरराव हे हसरे, मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या होत्या. नगरसेवक अहिरराव यांनी प्रभाग क्रमांक सहामध्ये विकास कामांसाठी मुबलक निधी मिळविला होता. विकासप्रश्‍नी आणि हद्दवाढीतील क्षेत्रात कामे मिळण्यासाठी, नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी ते स्वकीयांशी लढायला मागेपुढे पाहात नसत. अपघातात चौघे मित्र जागीच ठार झाल्याने विविध क्षेत्रातून दुःख व्यक्त झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT