Recovery esakal
उत्तर महाराष्ट्र

वीज चोरी करणाऱ्यांकडून साडेचार लाखांची वसुली

विनोद शिंदे

कुसुंबा (जि. धुळे) : येथील वीज वितरण कंपनीकडून वीज चोरी करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यात चार लाख ४४ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. ही कारवाई सहाय्यक अभियंता शशिकांत गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कुसुंबा परिसरात अचानक पथकांसह तपासणी केली असता, मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याचे दिसून आले. यात वीजतारांवर आकडे टाकणे, मीटरमध्ये फेरफार करणे, अतिरीक्त लोड वापर आदी प्रकारची वीज चोरी करणारे व्यावसायिक व इतर ग्राहक आढळून आले. त्यात कुसुंबा येथे १२,

गोताणेत ९, कावठीत १२, चौगावला ४, अशा चारही गावांमध्ये धाडी टाकून ३७ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यात चार लाख ४४ हजार रुपये वसूल करण्यात आले. वीज कंपनीचे सहाय्यक अभियंता शशिकांत गांगुर्डे, रवींद्र नेरपगारे, संदीप देशमुख, भारत कुवर, गणेश पगारे, भरत गोसावी आदींनी ही कारवाई केली.

दरम्यान, वीज वितरण कंपनीकडून मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यासाठी तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या, लोंबकळणाऱ्या तारा आदी दुरुस्तीची कामे जोरात सुरू आहेत.

"ग्राहकांनी कुठल्याही प्रकारची वीज चोरी करू नये. तसे आढळून आल्यास दंडात्मक कार्यवाहीस सामोरे जावे लागेल. सध्या मान्सूनपूर्व कामे सुरू आहेत. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात वीजपुरवठा वेळोवेळी खंडित होऊ शकतो, त्यासाठी वीज कंपनीला सहकार्य करावे. वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ टाळण्यासाठी ग्राहकांनी वीजबिल त्या-त्या महिन्यांत भरावीत."

-शशिकांत गांगुर्डे, सहाय्यक अभियंता, कुसुंबा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Vande Bharat News: पुणे रेल्वे स्थानकावर मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा अपघात कसा झाला? कारण आलं समोर, चौकशीचे आदेश

Axar Patel Reaction : मलाच काही समजत नाहीए...! RCB ने दिलेल्या धक्क्यानंतर अक्षर पटेल गोंधळला; म्हणतो, आता काय पुढे...

Pune Charity Commissioner : पारदर्शक न्यायदान हाच न्यायव्यवस्थेचा कणा : पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोठलीकर यांचा कार्यभार स्वीकारताना निर्धार

Virat Kohli Record! विराट कोहलीने IPL इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम केला, पहिला फलंदाज ठरला; रोहित खूपच लांब राहिला

Mohol Crime : पैशाच्या वादातून एकाचा खून, एक गंभीर जखमी; आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT