उत्तर महाराष्ट्र

घरकुलांसाठी मोफत पाच ब्रास वाळू

सकाळवृत्तसेवा

भडगाव - राज्यात वाळू लिलावाच्या अभावी शासकीय अनुदानातून मंजूर असलेल्या घरकुल बांधण्याची कामे बंद पडली आहेत. त्यावर सरकारने तोडगा काढत एका घरकुलासाठी मोफत पाच ब्रास वाळू देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत सरकारने मंगळवारी परिपत्रक काढले.

सप्टेंबर 2018 पासून राज्यात वाळू उचलण्यास बंदी आहे. त्यामुळे विकासकामांसह घरकुलांची कामे रखडली आहेत. बांधकाम व्यवसायही मंदावला आहे. वाळू लिलावाच्या संदर्भात अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता मंजूर घरकुलांना "ब्रेक' लागला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने शासकीय अनुदान मंजूर घरकुलांना पाच ब्रासपर्यंत वाळू मोफत देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय नोव्हेंबरमध्ये घेतला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : व्होट बँकेसाठी काँग्रेसने राम मंदिराचा अपमान केला - पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT