police case file
police case file sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : नवविवाहितेच्या आत्महत्येचा 5 जणांवर गुन्हा दाखल

सचिन पाटील.

शिरपूर (जि. धुळे) : उच्चशिक्षित विवाहित युवतीने (newlywed women) शेतात काम करावे यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ (Physical & mental harassment) करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरुन पाच जणांविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (5 charged with newlywed suicide dhule crime News)

लग्न होऊन महिनाही झाला नसताना नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १६ जूनला जोयदा (ता.शिरपूर) येथील दोंदवाडेपाडा येथे घडली होती. मनीषा तोताराम पावरा (वय २६) असे मृत युवतीचे नाव असून २२ मेस तिचा विवाह तोताराम पावरा याच्याशी झाला होता. नर्सिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या मनीषाच्या आत्महत्येमागील कारणांबाबत चर्चा सुरु होती. मनीषाचे माहेर न्यू बोराडी (ता.शिरपूर) येथील आहे. तिच्यावर अंत्यसंस्कार व त्यानंतरचे विधी आटोपल्यानंतर वडील सुदाम काना पावरा यांनी २० जूनला सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. विवाहानंतर २७ मे ते १६ जूनदरम्यान सुरु असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून तिने १६ जूनला सायंकाळी घरात गळफास लावून आत्महत्या केली असे फिर्यादीत म्हटले आहे. संशयित पती तोताराम पावरा, सासरा मोतीराम पावरा, सासू शियानीबाई, दीर शांतिलाल, दिराणी आशाबाई (सर्व रा.दोंदवाडेपाडा) यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT