Sub Divisional Police Officer Sajan Sonwane, Dr. Kiran Deore and Dhandai Devi Tarun Aikya Mandal office bearers. esakal
उत्तर महाराष्ट्र

Navratri 2023 : 50 हजार भाविक नतमस्तक; कुलस्वामिनी धनदाईदेवीच्या मंदिरात भाविकांची मांदियाळी

सकाळ वृत्तसेवा

Navratri 2023 : येथील आदिमाया, कुलस्वामिनी धनदाईदेवीच्या मंदिरात भाविकांची मांदियाळी वाढली आहे. बुधवारी (ता. १८) दुपारपर्यंत सुमारे पन्नास हजार भाविक धनदाईदेवीच्या चरणी नतमस्तक झाले आहेत.

नवरात्रोत्वानिमित्त चार दिवसांपासून भाविकांची सकाळपासून गर्दी होत आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे, साक्री येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. किरण देवरे व वैशाली देवरे यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १७) सायंकाळी महाआरती झाली.(50 thousand devotees at Kulaswamini Dhandai Devi temple dhule navratri news)

धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष देवरे, खजिनदार उत्तमराव देवरे, सचिव महेंद्र देवरे, ज्येष्ठ संचालक यशवंतराव देवरे, निवृत्त केंद्रप्रमुख संजय भदाणे, प्राथमिक शिक्षिका वैशाली देवरे-भदाणे, साक्री ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील भदाणे, गणू महाराज, कीर्तनकार स्वप्नील महाराज गिरडकर, प्रभारी पोलिसपाटील रवींद्र बेडसे, रामादादा देवरे, प्रदीप ठाकरे, हिंमत देवरे (देऊर), विनायक देवरे, घनश्याम देवरे व भाविक उपस्थित होते.

आदिमाया धनदाईदेवीस सुमारे ७७ पेक्षा अधिक कुळांचे भाविक कुलदैवत मानतात. नवरात्रोत्सवात कुळदेवी मानणारे भाविक देवीला आहेर, साजशृंगार चढवितात. साडी, चोळीचा आहेर, सोन्या-चांदीचे दागिनेही चढविले जातात.

अष्टमीला सर्वाधिक गर्दी

धनदाईदेवीला कुळदेवी मानणारे भाविक विशेषतः अष्टमीच्या दिवशी दर्शनासह नवसपूर्तीसाठी प्राधान्य देतात. यंदा रविवारी (ता. २२) अष्टमी आहे. अष्टमी आणि रविवारच्या सार्वजनिक सुटीची संधी साधत सर्वाधिक भाविक हजेरी लावतील, असा अंदाज मंदिर प्रशासनाने व्यक्त केला आहे.

अष्टमीच्या दिवशी पहाटेपासून भाविकांची रीघ असेल. गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर चोवीस तास खुले असल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यावर यश मिळविता येते. भाविकांनी शिस्तीने दर्शन घेत नवसपूर्ती करावी, असे आवाहन धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

चक्रपूजेसह आरत्या लावण्यास प्राधान्य

नवरात्रोत्सवात घराघरात पाचवी, सातवी माळ, अष्टमी व नवमीला चक्रपूजा केली जाते. नाशिक जिल्ह्यातील देवीला कुलदैवत मानणारे भाविक धनदाईदेवीजवळ चक्रपूजा करतात. यासाठी कुटुंबातील सदस्य व भाऊबंदांना आणले जाते, तसेच देवीजवळ महिला भाविक अकरा, एकवीस, एकावन्न दिव्यांच्या आरत्या लावत नवसपूर्ती करतात. भाविक नवरात्रोत्सव, चैत्र व माघ महिन्यातील अष्टमीला देवीजवळ आरत्या लावतात.

चाळीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर व परिसरात चाळीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी आहे. शिवाय मंदिर परिसरात नऊ दिवस पोलिस बंदोबस्त तैनात आहे. श्री धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे पदाधिकारी, कर्मचारी, सेवेकरी गर्दीवर नियंत्रण ठेवत आहेत. गावातील शेकडो युवक, (स्व.) अण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालयातील रासेयोचे स्वयंसेवक, गावातील शाळेतील विद्यार्थी सहकार्य करत आहेत.

नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन व नवसपूर्तीसाठी राज्यासह गुजरात, मध्य प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावत आहेत. बुधवारी चौथ्या माळेनिमित्त भाविकांनी गर्दी केली. स्थानिकसह परिसरातील भाविकांची पावले पहाटे साडेपाचपासून मंदिराकडे वळत आहेत. मंदिराजवळ मंदिर प्रशासनाने पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व भक्तनिवासाची व्यवस्था केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT