Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : तब्बल 58 कोटी रुपये येणे बाकीच! मालमत्ता कर वसुलीची स्थिती

सकाळ वृत्तसेवा

धुळे : सरत्या आर्थिक वर्षात अर्थात मार्च-२०२३ अखेर मालमत्ता करापोटी महापालिकेच्या तिजोरीत एकूण ३४.२२ कोटी रुपये जमा झाले. जास्तीत जास्त कर वसुलीसाठी प्रयत्न करणाऱ्या महापालिकेच्या मालमत्ता कर विभागासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या प्रयत्नांमुळे यंदा ५८.१३ टक्के वसुली झाली.

असे असले तरी दर वर्षीप्रमाणे या प्रयत्नांना यंदाही मोठे यश मिळाले नाही. अर्थात या सर्व प्रयत्नांनंतरही तब्बल ३५ कोटी रुपये थकबाकी राहिली. अर्थात यात शास्तीचा मोठा वाटा आहे. (58 crore rupees to come Status of Property Tax Collection Dhule municipal corporation News)

महापालिकेचा प्रमुख आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेच्या यंत्रणेकडून दर वर्षी प्रयत्न होतात. यंदाही तसे प्रयत्न झाले. गेल्या काही महिन्यांपासून मालमत्ता कर विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोहीम सुरू केली होती.

या मोहिमेंतर्गत थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करणे, नळ कनेक्शन खंडित करणे, मोबाईल टॉवर सील करणे आदी स्वरूपाच्या कारवाया झाल्या. एखाददोन घटनांत मालमत्ताही जप्त करण्यात आली. या प्रयत्नांना महापालिका प्रशासनाकडून आयुक्तांनी शास्तीमाफी योजनाही जाहीर केली.

६ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत शंभर टक्के शास्ती माफ करण्यात आली होती. या योजनेचा अनेक थकबाकीदारांनी लाभ घेतला पण लाभ न घेणाऱ्यांचे प्रमाण त्यापेक्षा अधिक राहिले. त्यामुळे मार्चअखेर किती वसुली होणार याकडे लक्ष होते.

केलेले प्रयत्न, नागरिकांना वारंवार आवाहन, शास्तीमाफी योजनेचा लाभ या सर्व प्रयत्नांनंतरही अपेक्षेनुसार मात्र वसुली झाली नाही. अर्थात दर वर्षी अशी स्थिती राहते, यंदाही ती कायम राहिली.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

९३ कोटी मागणी

या वर्षी मनपा हद्दीतील मालमत्ताधारकांकडे महापालिकेचे तब्बल ९३ कोटी ५८ लाख रुपये घेणे होते. यात शास्ती अर्थात दंडाचा आकडाच तब्बल ३५ कोटी रुपयांपर्यंत होता. त्यामुळे ही थकबाकी वसूल करणे महापालिकेच्या यंत्रणेपुढे आव्हानच होते.

मार्चअखेर यातील ३४.९३ कोटी रुपये वसूल झाले. अर्थात यानंतरही तब्बल ५८ कोटी १३ लाख रुपये वसुली झाली नाही. त्यामुळे हा बोजा यंदाही कायम राहणार आहे. दरमहा शास्तीचा बोजा वाढतो. त्यामुळे लगेचच यात भर पडत जाणार आहे.

थकबाकीदार छोटे

ज्या मालमत्ताधारकांकडे आता थकबाकी घेणे आहे, त्यात बहुतांश थकबाकीदार छोटे थकबाकीदार असल्याचे अधिकारी म्हणतात. अर्थात लाखो रुपये थकीत असलेल्यांची संख्या फार मोठी नाही. त्यातही स्लम एरिया म्हणून ओळख असलेल्या भागात ही थकबाकी मोठ्या प्रमाणावर आहे.

दरम्यान, यंदा महापालिकेने अतिक्रमण निर्मूलनाची कारवाईदेखील सुरू केली आहे. त्यामुळे अनेक अतिक्रमणधारकांना आपले अतिक्रमण केव्हाही पाडले जाईल त्यामुळे मालमत्ता कर कशासाठी भरायचा, अशीही मानसिकता होती. त्यामुळेही अशा थकबाकीदारांकडून वसुली झालेली नाही.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

मालमत्ता कर मागणी-वसुलीची स्थिती (सर्व आकडे कोटीत)

मागणी अशी

-मागील...६६.४१

-चालू...२७.१७

-एकूण...९३.५८

वसुली अशी

-मागील...१६.७८

-चालू...१८.१५

-एकूण...३४.९३

-एकूण टक्केवारी...५८.१३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare : "मिस्टर राज, तुम्हाला माझ्या नावाची सुपारी..." सुषमा अंधारे यांचा लाव रे तो व्हिडीओवरून हल्लाबोल

Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ', सुषमा अंधारेंचा जुना व्हिडीओ दाखवून उद्धव ठाकरेंना सवाल

Ravindra Dhangekar : भाजपकडून पुण्यात पैसे वाटल्याचा आरोप, काँग्रेस उमेदवार धंगेकरांचं पोलिस ठाण्यात धरणे आंदोलन

Loksabha election : निवडणूक किस्सा! अमिताभ बच्चन उमेदवार अन् लिपस्टिकच्या खुणा असलेल्या चार हजार मतपत्रिका...

IPL 2024 RCB vs DC : आरसीबीची विजयी पंचमी; दिल्लीच्या पराभवाने पॉईंट टेबल झालं रंजक

SCROLL FOR NEXT