Dhule Crime News
Dhule Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : एमआयडीसीत सोयाबीन चोरी; 6 जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : अवधान (ता. धुळे) शिवारातील एमआयडीसीतून चोरीस गेलेल्या सोयाबीन घटनेचा मोहाडी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत छडा लावला. या प्रकरणी संशयित सहा जणांना ताब्यात घेतले. तसेच दोन वाहने जप्त केली. (6 arrested for soybean theft in MIDC dhule crime news)

एमआयडीसीतील जय दुर्गा इंडस्ट्रीजमधून ७ मेस ६३ हजार रुपयांचे सोयाबीनचे ५० किलो वजनाचे २३ कट्टे चोरीस गेले. याबाबत रवींद्र येडे यांनी मोहाडी पोलिसांकडे फिर्याद दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण कोते, एलसीबीचे प्रकाश पाटील यांनी पोलिसपथक तयार करून चोरीचा छडा लावला.

तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण करीत रवी यशवंत मालचे, करण शांताराम सोनवणे, नवनाथ महादू सोनवणे (तिघे रा. दिवाणमळा, ता. धुळे), सोमनाथ राजू सोनवणे, आकाश सुकदेव ठाकरे (दोघे रा. लळिंग, ता. धुळे) व दगा रामदास पवार (भिल, रा. जुन्नेर, ता. धुळे) या सहा संशयितांना ताब्यात घेतले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चौकशीत संशयितांनी सोयाबीन चोरीची कबुली दिली. तसेच सोयाबीनचे १५ कट्टे काढून दिले. पोलिसांनी चोरीचा माल नेण्यासाठी वापरलेली मालवाहू रिक्षा (एमएच १८, बीएच ०८६९), दुचाकी (एमएच १८, सीए ७२३६) असा एक लाख ३१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक पायमोडे, राहुल पाटील, जितेंद्र वाघ, मुकेश मोरे, बापूजी पाटील, जयकुमार चौधरी, मयूर गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : भुजबळ यांच्या नाराजीवर तटकरेंचे ‘ऑल इज वेल’; प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी घेतली भुजबळांची भेट

Nupur Shikhare- Ira Khan : नुपूर शिखरेच्या आईचा बॉसी अंदाज; नवऱ्याची अवस्था पाहून आमिरची लेक म्हणाली...

SRH vs GT: सामना रद्द झाल्यानंतर काव्या मारन अन् विलियम्सनचं रियुनियन, सनरायझर्स हैदराबादन शेअर केला खास Video

VIDEO: पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत भर कार्यक्रमात गैरवर्तन; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "दहा हजारपेक्षा जास्त लोकांचा जमाव..."

Latest Marathi News Live Update : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे

SCROLL FOR NEXT