bridge  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : चाळीसगाव चौफुलीवर ‘ट्रॅफिक’ला दिलासा; उड्डाणपुलास मंजुरी!

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरालगत महामार्गाचे चौपदरीकरण होऊनही चाळीसगाव चौफुलीवर रोजच उद्‌भवणाऱ्या ट्रॅफिक जॅममुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त असतात. त्याकडे कुठल्याही लोकप्रतिनिधींचे फारसे लक्ष नव्हते. (78 crore sanctioned for flyover at Chalisgaon Chaufuli dhule news)

या स्थितीत आमदार फारूक शाह यांनी हा प्रश्‍न हाताळत केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. यानंतर त्यांनी उड्डाणपुलास हिरवा कंदील देत ७८ कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती आमदार शाह यांनी दिली.

चाळीसगाव चौफुलीवर रोज तासन‍तास होणाऱ्या ट्रॅफिक जॅममुळे वाहनधारक वैतागले आहेत. हा प्रश्‍न कोण, कधी सोडवेल याची त्यांना प्रतीक्षा होती. हा गंभीर प्रश्‍न हाताळत आमदार शाह यांनी चाळीसगाव चौफुलीवर वेळोवेळी ठिय्या आंदोलन करत प्रशासन आणि केंद्र, राज्य शासनाचे लक्ष वेधले.

तसेच उड्डाणपुलाच्या मंजुरीसाठी निवेदने दिली. त्यांच्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी चाळीसगाव चौफुली येथे उड्डाणपुलासाठी ७८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. याबाबत वाहनधारकांतर्फे आमदार शाह यांनी मंत्री गडकरी यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

धुळे शहरालगत मुंबई-आग्रा आणि धुळे ते सोलापूर महामार्ग व्हाया चाळीसगाव जातो. हे दिवसरात्र अतिवर्दळीचे महामार्ग आहेत. तरीही चाळीसगाव चौफुलीवर सिग्नल यंत्रणा बंद असते. दिवसभरातील ट्रॅफिक जॅममुळे नियमित चालणारे वादविवाद, अनेक लहान-मोठे अपघात, प्रसंगी त्यातून निर्माण होणारा तणाव आदी घटनांना प्रशासनाला सामोरे जावे लागते.

तसेच सुलतानिया मदरशाजवळ सर्व्हिस रोड, पथदीप, गटारी नाहीत. पथदीप नसल्याने तेथे कोरोनाच्या संकटकाळातील लॉकडाउनमध्ये खुनाची घटना, चोऱ्यामाऱ्या, लूटमार, अपघात यांसारख्या अनुचित घटनांमुळे शहराच्या प्रतिमेस धक्काही लागत असतो. तशा तक्रारी वेळोवेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे आणि व्यवस्थापक संजय गुरव यांच्याकडे आमदार शाह यांनी पत्राद्वारे केली. तसेच केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे उड्डाणपुलाची मागणी केली.

ट्रॅफिक जॅमचा प्रश्‍न सुटणार

याप्रश्‍नी दोन महिन्यांपूर्वी उड्डाणपूल होण्यासाठी चाळीसगाव चौफुलीवर आंदोलनही झाले होते. त्याची दखल घेत मंत्री गडकरी यांनी निधी उपलब्धतेतून हा प्रश्‍न मार्गी लावला आहे. महामार्ग प्राधिकरणाने चाळीसगाव चौफुली येथे उड्डाणपूल होणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे. लवकरच काम सुरू होणार असल्याने चाळीसगाव चौफुलीवरील ट्रॅफिक जॅमचा प्रश्‍न सुटून वाहनधारकांना दिलासा मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT