Corona Positive Report sakal
उत्तर महाराष्ट्र

शिंदखेड्यात ८ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

सभापती निवडीवेळी पीठासीन अधिकाऱ्यांसह पंचायत समिती सदस्य, भाजप कार्यकर्त्यांना कोरोनाचा विसर

सकाळ वृत्तसेवा

चिमठाणे : शिंदखेडा पंचायत समितीचे चार कारकून व चार परिचर बुधवारी (ता.१९) कोरोनाबाधित (corona positive) आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र गुरुवारी (ता. २०) ला दुपारी तीनला सभापती निवडीसाठी भारतीय जनता पक्षांचे (BJP)कार्यकर्ते व प्रशासन यांनी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून सभापती निवड केली.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात कोरोना संसर्गाने डोके वर काढले आहे. शिंदखेडा व दोंडाईचा शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र कुठल्याही शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यासह कर्मचारी आणि नागरिक व ग्रामस्थ कुठलेही कोरोनाचे नियमांचे पालन न करता बिनधास्त आहेत. गुरुवारी (ता. २०) तालुक्यात ३७ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले असून असे एकूण ७८ रूग्ण तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

सभापती निवडीवेळी गर्दी

शिंदखेडा पंचायत समितीच्या सभापती निवडीवेळी अधिकाऱ्यांसह कर्मचारी व पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांनी तर साधे मास्कही तोंडावर लावले नव्हते. सभापतीपदी अनिता पवार यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना कोरोनाचा जणू विसर पडली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT