Funds News
Funds News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : महामार्गासाठी 98 कोटींचा निधी मंजूर; खासदारांचा पाठपुरावा

सकाळ वृत्तसेवा

धुळे : कुसुंबा (ता. धुळे) ते दोंडाईचा (ता. शिंदखेडा) या ५५ किलोमीटरच्या मार्गासाठी खासदार तथा संसदरत्न डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamre) यांच्या पाठपुराव्याअंती केंद्रातील मोदी सरकारने तब्बल ९८ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

या मार्गामुळे वाहनधारकांचा वेळ, इंधनासह खर्चात बचत होणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे, असे खासदार डॉ. भामरे यांनी सांगितले. (98 crore fund sanctioned for 55 km route from Kusumba to Dondaicha dhule news)

खासदारकीच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत प्रामुख्याने जनतेच्या जिव्हाळ्याचा मनमाड- मालेगाव- धुळे- इंदूर रेल्वेमार्ग, धुळे- अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना, धुळे व शिंदखेडा तालुक्यासाठी वरदान ठरणारी सुलवाडे- जामफळ योजना मार्गी लावल्यानंतर आता कुसुंबा ते दोंडाईचा शहर ९८ कोटींच्या निधीतील रस्त्याव्दारे जोडले जाणार आहे. याकामी बहुमोल सहकार्य करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष आभार मानत असल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले.

५५ किमीचा महामार्ग

कुसुंबा ते दोंडाईचा शहराला जोडणारा हा महामार्ग दळणवळणासाठी महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी ठरणार आहे. यापूर्वी मालेगाव ते कुसुंबा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोन आणि तीनला जोडणारा महामार्ग ठरला आहे.

आता धुळे तालुक्यातील कुसुंब्यापासून कावठी, मेहेरगाव, नवलाने, चिंचवार, लामकानी, शेवाडे, देगाव, अंजनविहीर, मांडळ, दोंडाईचा शहराला जोडणारा नवा महामार्ग होईल. या मार्गाचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाव्दारे रुंदीकरण आणि डांबरीकरण होणार असून ५५ किमीचा हा महामार्ग राष्ट्रीय महामार्गाच्या मानकाप्रमाणे सात मीटर रुंद असणार आहे, असे खासदार डॉ. भामरे यांनी सांगितले.

पाइप मोरींसह पूल

कुसुंबा ते दोंडाईचा शहरापर्यंतच्या महामार्गावर ३८ ठिकाणी लहान- मोठ्या पाइप मोरी, छोटे- मोठे पूल असणार आहेत. या महामार्गासाठी ९७ कोटी ९९ लाखांच्या निधीची तरतूद झाली आहे. शासकीय सोपस्कार, निविदा प्रक्रियेनंतर कामाला सुरवात होणार असल्याचेही खासदारांनी सांगितले.

सात राष्ट्रीय महामार्ग

असे असताना मोदी सरकारने यापूर्वीच जिल्ह्यातून जाणारे चार मार्ग हे राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर केले आहेत. यात जिल्ह्यात आधीपासून असणारा मुंबई- आग्रा, नागपूर- सुरत, धुळे ते औरंगाबाद या तीन राष्ट्रीय महामार्गांनतर नव्याने चार अशा महामार्गांची भर पडली आहे. यामध्ये शेवाळी- निजामपूर- नंदुरबार- तळोदा- अक्कलकुवा हा (चौपदरीकरणासह) धुळे जिल्ह्यातील ३२ किलोमीटरचा आणि सुमारे ४५० कोटींच्या किमतीचा,

शिर्डी ते नगर विभाग वगळून साक्री- सटाणा- देवळा- चांदवड- मनमाड- येवला- कोपरगाव- शिर्डी- राहुरी- नगर- काडा- आष्टी- जामखेड-बीड हा धुळे जिल्ह्यातील ३३ किलोमीटर आणि सुमारे २८० कोटींच्या किमतीचा, दोंडाईचा- कुसुंबा- डोंगराळे- मालेगाव हा धुळे जिल्ह्यातील ६६ किलोमीटर आणि सुमारे ५६० कोटींच्या किमतीचा,

सोनगीर- शहादा- स्वात- मोहोल- कुरूड- कसाठे- बारूलनगर हा धुळे जिल्ह्यातील ५१ किलोमीटर आणि सुमारे ४६० कोटींच्या किमतीचा राष्ट्रीय महामार्ग जाहीर झालेला आहे. सात राष्ट्रीय महामार्ग असलेला धुळे जिल्हा एकमेव असल्याचेही खासदार डॉ. भामरे यांनी पूर्वीच सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी 2192 वाहनांचा शोध सुरू; 4 हजार 800 मतदान केंद्रे

MI vs SRH IPL Playoffs : टेन्शन फ्री मुंबई वाढवणार हैदराबादच्या ह्रदयाचे ठोके, एक हार अन् खेळ खल्लास?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

SCROLL FOR NEXT