उत्तर महाराष्ट्र

जळगाव - उधना रेल्वे मार्ग उठला रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जीवावर ;होळीच्या दिवशीच कोकणी कुटुंबावर काळाचा घाला

धनराज माळी

नंदुरबार : रेल्वे ट्रॅकवर काम करतांना अचानक समोरुन आलेल्या रेल्वेखाली चिरडून रेल्वे ट्रॅकमनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ठार तर गँगमनला गंभीर दुखापत झाली असून नंदुरबार येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. होळीच्या दिवशीच रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने कोकणी कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे.

गेल्या आठवड्याभरात तीन कर्मचाऱ्यांचा रेल्वे रुळावर मृत्यू झाल्याने रेल्वे मार्ग कर्मचाऱ्यांच्या जीवावर उठला आहे की काय ? काहीसा असाच सवाल उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास खांडबारा रेल्वे स्थानकाजवळीलकि . मा .133 / 14-116 दरम्यान मेन लाईनवर नवापूर तालुक्यातील वडदा येथील रेल्वे ट्रॅकमॅन मिसल्या जीवल्या कोकणी ( वय 55 ) व गँगमॅन रणजित विश्वास कोकणी ( वय 37, रा . श्रावणी ता.नवापूर ) हे दोघेजण काम करत होते. अचानक रेल्वे क्र .0 9 23 9हापा - विलासपूर भरधाव वेगाने आली. यावेळी दोन्ही रेल्वे कर्मचारी काम करत असतांना अचानक एक्स्प्रेसच्या इंजिनची धडक लागून मिसल्या कोकणी यांना गंभीर दुखापत झाल्याने ते ठार झाले. तर गँगमॅन रणजित कोकणी यांच्या पायांना गंभीर दुखापत झाल्याने नंदुरबार येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत नंदुरबार रेल्वे पोलिसात नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ.शामसिंग वळवी करीत आहेत . दरम्यान , जळगाव - उधना रेल्वे मार्ग रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जीवावर उठला आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आठवडाभरापूर्वी ही अपघात

आठवडाभरापूर्वीच नंदुरबार रेल्वे स्थानकावर रुळ ओलांडत असतांना मालगाडीखाली आल्याने एका रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता . तर याच मार्गावर नरडाणा स्थानकाअंतर्गत एका रेल्वे कर्मचाऱ्याचा असाच मृत्यू झाला. तर काल रेल्वेच्या धडकेत सदर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने रेल्वे मार्ग कर्मचाऱ्यांच्या जीवावर उठला आहे का ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे .
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आरोपी वृद्ध, क्रूर गुन्हा करू शकतो का? नराधमाच्या वकिलांनी केली जन्मठेपेची मागणी, न्यायाधीशांनी फेटाळला युक्तिवाद

Sanjay Manjrekar: रोहित, विराट किंवा बुमराह नाही...'; टीम इंडियाच्या निवडीवर संजय मांजरेकर स्पष्टच बोलले म्हणाले यशस्वी जैस्वालला...

Maharashtra Politics: मविआला मोठा धक्का! बैठकीला ६० पैकी २३ आमदार गैरहजर; उद्धव ठाकरेंचा एकीचा सवाल

Pune Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणी भीमराव कांबळे दोषी! २९ जूनला शिक्षा... कोर्टात काय घडलं?

NCERT Emergency 1975 : नववीची मुले शिकणार 'आणीबाणी'चा इतिहास; एनसीआरटीने अभ्यासक्रमात केला मोठा बदल

SCROLL FOR NEXT