Accident news Esakal
उत्तर महाराष्ट्र

Accident news: भीषण अपघातात संपुर्ण कुटूंब संपलं; रुग्णालयात निघालेल्या वृद्ध आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू

Accident news: हिंगोलीमध्ये भीषण अपघातात कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

हिंगोलीमध्ये भीषण अपघातात कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आई-वडिलांना दुचाकीवरुन रुग्णालयात घेऊन जात असताना झालेल्या अपघातात मुलगा, आई-वडील असा तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हिंगोलीच्या डिग्रस वाणी गावातील तिघांच्या मृत्यूने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

या अपघातामध्ये कुंडलिक जाधव, कलावती जाधव व मुलगा आकाश जाधव अशी मृतांची नावे आहेत. आकाश जाधव बुधवारी रात्री आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात घेऊन जात होता. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच दुचाकीचा अपघात झाला. रात्रीच्यावेळी अपघात झाल्याने घटना उघडकीस आली नाही. सकाळी अपघाताची माहिती समोर आली आहे.

रस्त्यावरून जात असताना दुचाकी एका वळणावरून रस्त्याच्या शेजारील नाल्यात कोसळली. दुचाकीसह तिघेही नाल्यामध्ये पडले. या रस्त्यावरून रहदारी नसल्याने अपघाताची माहिती कुणालाही मिळाली नाही. त्यामुळे तिघांनाही रात्रभर मदत मिळाली नाही.

आज (गुरुवारी) सकाळी दूध विक्रेते या रस्त्यावरून जात असताना हा अपघात झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती ग्रामस्थांसह पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तिघांचाही या अपघातात मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्माचे शतक! शुभमन गिलसोबत विक्रमी भागीदारी; गांगुली-तेंडुलकर यांचा १९९८ चा विक्रम संकटात...

Satara DJ Rules: सण-उत्सवात डीजेचा आवाज वाढवला तर खिसा रिकामा! व्यक्तीला ५० हजार, मंडळांना १ लाखांची अनामत

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

SCROLL FOR NEXT