bike accident.jpg 
उत्तर महाराष्ट्र

दिवाळी खरेदीसाठी गेले..रस्त्यात मृत्यूने गाठले

दिगंबर पाटोळे :सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वणी - नाशिक रस्त्यावरील ओझरखेड धरण कालव्याच्या कठड्याला कार आढळून २ युवक ठार तर दोघे जखमी झाले आहे. मंगळवारी (ता.२२) रात्री नऊ वाजेच्या सुमारास नाशिकहून नांदुरी येथे जाणाऱ्या कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ओझरखेड धरणाच्या पुलाच्या कठड्याला जोरदार धडक देवून पलटी झाली.

अपघातात २ युवक ठार तर दोघे जखमी

सनी ज्ञानेश्वर मोरे (वय १८) रा. नांदुरी हा महाविद्यालयीन  विद्यार्थी जागीच ठार झाला आहे. तर मानिक सुरेश राऊत, (वय २१) रा. नांदुरी, जगन वामन चव्हाण, (वय २५) रा. हिरीडपाडा बोरगांव व हंसराज भगवान गायकवाड (वय १२) रा. बोरगाव हे जखमी झाले आहे. जखमींना ग्रामिण रुग्णालयात उपचार करुन नाशिक येथे पुढील उपचारासाठी नेत असताना गंभीर जखमी असलेल्या जगन चव्हाण यांचेही रस्त्यातच निधन झाले. जखमींवर वणी ग्रामिण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ. मोरे, डॉ. प्रकाश देशमुख यांनी उपचार केले.  मयत सनी मोरे व जखमी मानिक राऊत हे दिवाळीची खरेदीसाठी नाशिक येथे गेले होते. सीबीएस बसस्थानकावर एसटीने नांदुरी येथे येणार होते, मात्र आेळखीचे वाहन मिळाल्याने ते महिंद्रा कारने नांदूरी येथे परतत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT