accident shelbari 1.jpg
accident shelbari 1.jpg 
उत्तर महाराष्ट्र

अ‍ॅक्सिडंट स्पॉट बनतोय पिंपळनेरचा 'हा' घाट

अंबादास बेनुस्कर : सकाळ वृत्तसेवा

पिंपळनेर :  नाशिकहून येणारी पुणे नंदुरबार शिवशाही एसटी बस (एमएच -१८बिजी. २४२७) पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास पिंपळनेर जवळील शेलबारी घाटात रिमझिम पावसामुळे रस्त्याखाली उतरुन उलटली. बसमधील चोवीस पैकी आठ प्रवासी जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड व उपनिरीक्षक भाऊसाहेब नर्हे, परिसरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

पिंपळनेर पोलिसात अपघाताचा गुन्हा

साक्री आगार प्रमुख पंकज देवरे,स्थानक प्रमुख ललिता गायकवाड,बाबा पाटील, वसिम पठाण,यांनी जखमींची भेट घेऊन रोख रुपये १०००, व ५०० रुपयांची रोख मदत दिली. याबाबत पिंपळनेर पोलिसात अपघाताचा गुन्हा नोंदविला जात आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली.करीत आहेत.'एसटी चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण या भागात नेहमीच अपघात होत असतात.

सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने जखमीं ग्रामीण रुग्णालयात दाखल

जखमींची नावे -(खाजगी चालक) -प्रदिप सुरेश पाटील (वय ३५)रा.नंदुरबार,वाहक-विजय प्रताप ईसी(वय ३२)रा.नंदुरबार,(राहुल पितांबर पाटील (वय २४)रा. साक्री,निखिल संजय साळुंखे (वय २२) रा. साक्री,दिपाली शाम खैरनार (वय ३२)रा.छडवेल,तन्मय दिलीप खैरनार (वय २३)रा.छडवेल,राजेंद्र भटू मारनर (वय २३)रा.वाघापूर,संतराम सोनु मारनर(वय १८)रा.वाघापूर,यांना ग्रामिण रुग्णालय पिंपळनेर येथे दाखल करुन वैद्यकीय अधिकारी डॉ.राकेश मोहने यांनी उपचार केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT