धुळे : वलवाडी शिवारातील सुशिनाल्याजवळ गांजा बाळगणाऱ्यांवर पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर कारवाई केली. त्यात गांजासह ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यात संशयित तिघांना ताब्यात घेण्यात आले. तसेच अन्य एक जण पसार झाला.
शहराचे पोलिस उपअधीक्षक हृषिकेश रेड्डी यांना वलवाडी शिवारातील अमरधाम येथे चौघे जण गांजा बाळगून असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार श्री. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याचे निरिक्षक नितीन देशमुख यांच्यासह पथकाने कारवाई केली. (Action against four people carrying ganja Sixty Thousand worth of valuables seized in Dhule one absconding Dhule News)
छाप्यात राहुल सुरेश मोहिते (वय २६, रा. दैठणकर नगर, देवपूर), भटू रंगनाथ ठाकरे (२३), संतोष शिवदास मोरे (३८, दोघे रा. वलवाडी), बापू ठाकरे (रा. इंदिरा नगर, देवपूर) या चौघांकडे विक्रीच्या उद्देशाने गांजा आढळला. संशयित बापू ठाकरे हा अंधाराचा फायदा घेत पसार झाला.
उर्वरित संशयित तिघांना पथकाने नऊ हजार ६०० किमतीचा गांजा, ५० हजार किमतीचे चार मोबाईल व एक हजार ६० रुपयांची रोकड, अशा एकूण ६० हजार ६६० किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. नंतर पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याचे हवालदार पुरुषोत्तम सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार संशयित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.