unauthorized school
unauthorized school esakal
उत्तर महाराष्ट्र

अनधिकृत शाळांवर होणार कारवाई

सकाळ वृत्तसेवा

धुळे : अनधिकृत शाळा (Unauthorized school) सुरू राहिल्यास तेथील कर्मचारी, पालक, विद्यार्थी आदींची फसवणूक होण्याची शक्यता असल्याचे नमूद करत प्राथमिक शिक्षण संचालकांनी अनधिकृत शाळांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. नियमानुसार अनधिकृत शाळांना एक लाख रुपये दंड आणि शाळा बंद करण्याची सूचना देऊनही ती सुरू राहिल्यास प्रति दिन दहा हजार रुपये दंड ठोठावण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पडताळणीसह सर्वेक्षणाची कार्यवाही सुरू आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी परिपत्रकाद्वारे कार्यवाहीची ही सूचना आहे. राज्य मंडळाशी संलग्न शाळांसाठी राज्य शासनाचे परवानगी आदेश, तसेच सीबीएसई, आयसीएसई, आयबी आदी मंडळांशी संलग्न शाळांसाठी राज्य शासनाचे ना हरकत प्रमाणपत्राशिवाय शाळा सुरू करण्यात आली असल्यास आणि मान्यता काढून घेतलेली शाळा सुरू असल्यास त्या शाळेला अनधिकृत शाळा म्हणून घोषित करावे, अनधिकृत शाळांची यादी जाहीर करावी, अनधिकृत शाळेत पाल्यांसाठी प्रवेश घेऊ नये, संबंधित शाळेत प्रवेश घेतल्यास शैक्षणिक नुकसान होईल, अशी सूचना आहे. तसा फलक शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्याचीही सूचना आहे. अनधिकृत शाळांची अद्ययावत यादी जिल्हास्तर, तालुकास्तर कार्यालयाच्या आवारात लावली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT