Farooq Shah laying the groundwork for the administrative building in MIDC esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : प्रशासकीय इमारतीचे काम सुरू; MIDC येथे आमदार शाह यांच्या हस्ते भूमिपूजन

एमआयडीसीत पाठपुराव्याअंती प्रशासकीय इमारतीसाठी दहा कोटी बारा लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : एमआयडीसीत पाठपुराव्याअंती प्रशासकीय इमारतीसाठी दहा कोटी बारा लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यानुसार या कामाचे भूमिपूजन सोमवारी (ता. ८) झाल्याची माहिती आमदार फारूक शाह यांनी दिली. त्यांच्या हस्ते कामास सुरवात झाली.(Administrative building work started MIDC by MLA Shah Bhumi Pujan Dhule News)

ते म्हणाले, की धुळे शहर व नरडाणा येथील औद्योगिक वसाहत चांगल्या प्रकारे विकसित होत आहे. पूर्वी उद्योजकांना वेगवेगळ्या समस्यांच्या निराकरणासाठी नाशिक व जळगाव येथे जावे लागत होते.

ही समस्या स्थानिक उद्योजकांनी माझ्याकडे मांडली. त्यांच्या निवेदनाचा विचार करता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे ही मागणी मांडली. याकामी दोन वर्षे पाठपुरावा केला. उद्योगमंत्र्यांनी धुळे एमआयडीसीच्या प्रशासकीय इमारतीसाठी दहा कोटी बारा लाखांचा निधी मंजूर केला.

अधिकारी आणि उद्योजकांसाठी ही सुविधा सोयीची असेल. भूमिपूजनावेळी अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी सेमिनार घेण्यात यावा. त्यामुळे उद्योजकांना चालना मिळेल, अशी मागणी या वेळी झाली.

औद्योगिक वसाहतीसाठी सुसज्ज अग्निशमन केंद्र उभारण्याचे कामही प्रगतिपथावर असून, वसाहतीचा पाण्याचा प्रश्न ३७ कोटींच्या निधीतील हरण्यामाळ पाणीपुरवठा योजना मंजूर करून निकाली काढल्याचे आमदार शाह यांनी सांगितले.

भिखन हाजी शाह, डॉ. दीपश्री नाईक, निजाम सय्यद, इकबाल शाह, डॉ. बापूराव पवार, आसिफ शाह, हारून खाटीक, सउद आलम, सलमान खान, रियाज शाह, समीर शाह, फैसल अन्सारी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : उदय सामंतांनी घेतली शरद पवार यांची भेट...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

अरे हा काय टाइमपास लावलाय... तेजश्री- सुबोधच्या नव्या मालिकेवर प्रेक्षक नाराज; म्हणतात- एकही भाग पॉझिटिव्ह...

Kolhapur Flyover Project : कोल्हापुरात दोन उड्डाणपूल होणार, सायबर चौक, संभाजीनगर चौकात उभारणी शक्य, अमल महाडिक यांची माहिती

SCROLL FOR NEXT