Member Harsh Kumar Raylan speaking in the Manpa Standing Committee meeting on Thursday esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Municipality News : संकुलाच्या उत्पन्नावर साडेचार वर्षांनंतरही उत्तर सापडेना; सभापतींचे ‘हात वर’

सकाळ वृत्तसेवा

Dhule Municipality News : गेली चार-साडेचार वर्षे तेच ते प्रश्‍न विचारून वैतागलेल्या सदस्यांना किमान पुढच्या वेळी उत्तर द्या, अशी तंबी सभापतींनी दिलेली असताना त्याच प्रश्‍नांवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सदस्यांची फसवणूक केल्याचे चित्र स्थायी समिती सभेत पाहायला मिळाले.

विशेषतः सत्ताधारी भाजपचे सदस्य हर्षकुमार रेलन यांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर ‘जैसे थे’ स्थिती दिसली. विशेष म्हणजे सभापतींनीही आता महापौरांकडेच उत्तर मागा, असे म्हणत हात वर केल्याचे चित्र पाहायला मिळाले. (after four and half years no answer was found on income of municipality officer dhule news)

महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवारी (ता. ९) सकाळी अकराला महापालिका सभागृहात झाली. सभापती किरण कुलेवार, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. सत्ताधारी भाजपचे सदस्य रेलन यांनी आपण आज कोणताही प्रश्‍न विचारणार नाही.

मात्र, मागील सभेत दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे प्रश्‍नांची उत्तरे मिळावीत, अशी मागणी केली. त्यावर अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी सुरू झाली. शेवटी श्री. रेलन यांनीच प्रश्‍न पुन्हा मांडले. त्यातील साक्री रोडवरील मनपा शाळा-१४ च्या प्रस्तावाबाबत काय झाले, अशी विचारणा केली.

त्यावर अभियंता कैलास शिंदे यांनी आर्किटेक्ट नेमल्याचे सांगितले. त्यानंतर बीओटी तत्त्वावरील व्यापारी संकुलातील किती दुकाने भाड्याने दिली, त्यातून किती उत्पन्न मिळाले, भाडे कोण वसूल करत आहे, अशी विचारणा केली.

या प्रश्नावरून पुन्हा एकदा वेळ मारण्याची पद्धत अवलंबली. बाजार विभागप्रमुख किशोर सुडके यांनी कार्यवाही सुरू आहे, वकिलांचा अभिप्राय घेतला, शहर अभियंता भाडे ठरवतील, भाडे वसूल होणारच आहे, अशी नेहमीची उत्तरे दिली तर करमूल्य निर्धारण अधिकारी पल्लवी शिरसाट यांनी हा विषय विविध विभागांशी संबंधित असल्याने एकत्रित बैठक घ्यावी लागेल, आयुक्तांनी त्याबाबत खुलासा केलाच आहे, असे उत्तर दिले. गेली साडेचार वर्षे प्रश्‍न विचारत आहे. २५ बैठकांमध्ये अशीच उत्तरे मिळत आहेत, असे म्हणत सदस्य श्री. रेलन यांनी संताप व्यक्त केला.

सभापतींचेही हात वर

सभापती श्रीमती कुलेवार यांनी हा प्रश्‍न बुधवारी (ता. ८) महासभेतही उपस्थित झाला. त्यावर महापौरांनी उत्तर दिले आहे. त्यामुळे पुन्हा त्यावर चर्चा नको अशी भूमिका मांडली. मात्र, हा प्रश्‍न वेगळा आहे. आपण स्थायीत प्रश्‍न मांडला असून, येथेच उत्तर हवे, असा आग्रह श्री. रेलन यांचा होता. शेवटी अधिकारीही दाद देत नसल्याचे पाहून सभापती श्रीमती कुलेवार यांनी हा प्रश्‍न महासभेतच मांडा, तिथेच तुम्हाला उत्तर मिळेल, असे उत्तर देत हात झटकले.

शौचालयप्रश्‍नीही उत्तर नाही

प्रभागातील मिलिंद सोसायटीतील सार्वजनिक शौचालयाबाबतही श्री. रेलन यांच्या प्रश्‍नाला उत्तर मिळाले नाही. मात्र, सभागृहातील वातावरण पाहता अभियंता शिंदे यांनी २४ तासांत श्री. रेलन यांना उत्तर देतो, असे म्हणत वेळ निभावली. मात्र, सदस्य सुनील बैसाणे यांनी या प्रश्‍नाचे उत्तर दिले हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT