dhule market committee
dhule market committee esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Market Committee Election : भाजप स्वबळावर लढणार

सकाळ वृत्तसेवा

धुळे : येथील धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची (Market Committee Election) निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय भाजपच्या स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. (Agricultural Produce Market Committee elections Local BJP leaders and office bearers have decided to contest on their own dhule news)

निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी मंगळवारी (ता. २८) सकाळी साडेदहाला पारोळा रोडवरील राम पॅलेसमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी केले.

राम पॅलेसमधील खासदार संपर्क कार्यालयात धुळे तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. खासदार डॉ. सुभाष भामरे अध्यक्षस्थानी होते. बैठकीत धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. बाजार समितीत माल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होतो.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

कष्टाने घाम गाळून पिकविलेल्या मालाचे उचित मूल्य मिळत नाही. मालाची हेळसांड होते. गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेली बाजार समिती गुंडगिरीमुळे बदनाम झाल्याने व्यापार कमी झाला आहे. या स्थितीत शेतकऱ्यांनी घामाने पिकविलेल्या मालास उचित भाव मिळणे, शेतकऱ्यांची लूट थांबविणे, उपबाजार समितीच्या विकासासाठी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्धार उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून झाला.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे, मनोहर भदाणे, प्रा. अरविंद जाधव, उत्कर्ष पाटील, रामकृष्ण खलाणे, शंकरराव खलाणे, संग्राम पाटील, राम भदाणे, आशुतोष पाटील, किशोर आलोर, रोहिदास पाटील, श्रीराम पाटील, भाऊसाहेब देसले, रितेश परदेशी, मोहन भदाणे, शरद पाटील, देवेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT