Amrishbhai Patel esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी अमरिशभाई पटेल; निवडणूक बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर (जि. धुळे) : येथील तालुका दूध उत्पादक व कृषिपूरक उद्योगसंघाची निवडणूक बिनविरोध झाली असून अध्यक्षपदी आमदार अमरिशभाई पटेल (Amrishbhai Patel) तर उपाध्यक्षपदी किरण यशवंत दलाल यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. (Amrishbhai Patel as new President of Milk Producers Union dhule news)

दूध उत्पादक संघाच्या संचालकपदाच्या १५ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. विहित मुदतीत सर्वसाधारण, महिला राखीव आणि इतर मागास प्रवर्गासाठी निवडून द्यावयाच्या संख्येत अर्ज दाखल झाले. माघारी अंतीही दाखल अर्ज कायम राहिले. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली.

पाठोपाठ अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड करण्यासाठी संचालकांची विशेष सभा घेण्यात आली. त्यात अध्यक्षपदासाठी अमरिशभाई पटेल तर उपाध्यक्षपदासाठी किरण दलाल यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने उभयतांची बिनविरोध निवड झाली.

नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक असे : अध्यक्ष अमरिशभाई पटेल (सर्वसाधारण मतदारसंघ), उपाध्यक्ष किरण दलाल (सर्वसाधारण मतदारसंघ), संचालक (सर्वसाधारण) रघू भरवाड, माधवराव पाटील, दिलीप पटेल, जयपाल परदेशी, नारायण चौधरी, दिलीप पाटील, गयबू पाटील, मधुकर देशमुख. महिला संचालक : विठाबाई पाटील, चंद्रकलाबाई जमादार, इतर मागास प्रवर्ग संचालक मोहन सोनवणे. या निवडणुकीत संघाच्या अनुसूचित जाती-जमाती व विमुक्त जाती-भटक्या जमाती या दोन्ही राखीव मतदारसंघासाठी एकही अर्ज प्राप्त न झाल्याने तेथील जागा रिक्त राहिल्या आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून विजय गरुड यांनी काम पाहिले. त्यांना व्यवस्थापक पटेल यांनी मदत केली.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

संघाला ऊर्जितावस्था मिळणार

आमदार अमरिशभाई पटेल यांनी दीर्घ कालावधीनंतर एखाद्या सहकारी संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. एकेकाळी मोठे दूधसंकलन, प्रक्रिया आणि पूरक उद्योगामुळे समृद्ध मानला जाणारा दूध उत्पादक संघ काही वर्षापासून अडचणीत सापडला आहे. त्याचा परिणाम दूधसंकलनावर झाला आहे. अमरिशभाईंनी धुरा स्वीकारल्यामुळे दूध संघाला नवी झळाळी लाभून तो ऊर्जितावस्थेत येईल अशी अपेक्षा दुग्ध व्यावसायिकांना लागून आहे.

"शेतीव्यवसायाला दुग्ध व्यवसायाची जोड दिल्याशिवाय पर्याय नाही. दुधाची मागणी टिकून आहे. सध्या दुधाला चांगला दरही मिळतो आहे. अशा वेळी अमरिशभाईंसारख्या दिग्गजांकडे या प्रकल्पाची धुरा सोपवल्याने सर्वदूर सकारात्मक संदेश पोचण्यास मदत होणार आहे. सहकार क्षेत्रातील अमरिशभाई पटेल यांचे ज्ञान, अनुभव यांचा लाभ दूध संघाला निश्चितच मिळणार आहे." -किरण दलाल, उपाध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT