Anganwadi workeralka valavi
Anganwadi workeralka valavi esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : मानसिक छळाला कंटाळून अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : तीन वर्षांपासून मोबदला नाही, अंगणवाडीतील बालकांना पदरमोड करीत पुरविलेल्या पोषण आहाराची खर्चित रक्कम मिळाली नाही,

उलट संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याने अंगणवाडीसेविकेने आत्महत्या केल्याची तक्रार अंगणवाडीसेविकेच्या पतीने पोलिसांकडे केली. (Anganwadi worker commits suicide due to mental torture nandurbar news)

त्यानुसार धडगाव महिला व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यासह पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जुगणीचा हिरीचापाडा (ता. धडगाव) येतील अंगणवाडी केंद्रात तेथीलच रहिवासी अलका अमिताभ वळवी (वय ३३) अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होती. तिला तीन वर्षांपासून कामाचा कुठलाही मोबदला मिळत नव्हता.

पगाराविना राबविणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी तिला मानसिक त्रास दिला. एवढेच नव्हे तर गावातील लोकांना चिथावणी देत त्यांनाही त्रास द्यायला लावला.

अशा वेगवेगळ्या माध्यमातून वर्षानुवर्षे होणारा त्रास व गरिबीला कंटाळून अंगणवाडीसेविका अलका वळवी ७ फेब्रुवारीस तोरणमाळ रस्त्यावरून पती अमिताभ वळवी यांच्यासोबत मोटारसायकलने जात असताना सात पायरी घाटात मोटारसायकलवरून उडी घेतली होती.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

त्यांना गंभीर अवस्थेत म्हसावद रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे म्हसावद पोलिसांत प्रथम आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

मात्र या प्रकरणी अमिताभ वळवी यांनी आपल्या पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पोलिसांकडे केली होती.

त्यानुसार अखेर सोमवारी (ता. १३) म्हसावद पोलिस ठाण्यात बालविकास प्रकल्प अधिकारी किशोर एस. पगारे (धडगाव), रवीन हांद्या वळवी, दारासिंग सोन्या वळवी, सरलाबाई रवीन वळवी, मालतीबाई दारासिंग वळवी या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अमृत आहारासाठीही खासगी खर्च

सेवेचा कुठलाही मोबदला मिळत नसल्याने अनेक वर्षांपासून गरिबीशी दोन हात करणाऱ्या मृत अलका वळवी अंगणवाडी केंद्रातील बालकांना अमृत आहारदेखील खासगी खर्चातून पुरवठा करीत होत्या. अशा प्रकारे आर्थिक बोजा वाढत होता, त्यातच अधिकाऱ्याचा त्रास, अशामुळे तिने आत्महत्या केली असल्याचे कळते.

मीटिंग ठरली अखेरची

एकात्मिक बालविकास प्रकल्प तोरणमाळ या प्रकल्पांतर्गत अंगणवाडी केंद्रांसाठी तोरणमाळ येथे मीटिंग घेण्यात आली. ही मीटिंग करून गावाकडे परत येत असताना अलका वळवी यांनी घाटात उडी घेत आत्महत्या केली, त्यामुळे ही मीटिंग तिच्यासाठी अखेरची ठरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare : "मिस्टर राज, तुम्हाला माझ्या नावाची सुपारी..." सुषमा अंधारे यांचा लाव रे तो व्हिडीओवरून हल्लाबोल

Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ', सुषमा अंधारेंचा जुना व्हिडीओ दाखवून उद्धव ठाकरेंना सवाल

Ravindra Dhangekar : भाजपकडून पुण्यात पैसे वाटल्याचा आरोप, काँग्रेस उमेदवार धंगेकरांचं पोलिस ठाण्यात धरणे आंदोलन

Loksabha election : निवडणूक किस्सा! अमिताभ बच्चन उमेदवार अन् लिपस्टिकच्या खुणा असलेल्या चार हजार मतपत्रिका...

IPL 2024 RCB vs DC : आरसीबीची विजयी पंचमी; दिल्लीच्या पराभवाने पॉईंट टेबल झालं रंजक

SCROLL FOR NEXT