धडगाव : गिर्यारोहक अनिल वसावे यांचा सत्कार करताना खासदार डॉ. हीना गावित.  esakal
उत्तर महाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय कामगिरी करणारा गिर्यारोहक अनिल वसावे पहिला आदिवासी युवक

प्रकाश पवार

धडगाव (जि. नंदुरबार) : जगातील सर्वात उंच शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाट येथील गिर्यारोहक अनिल वसावे याची निवड झाली आहे. या निवडी बद्दल खासदार डॉ. हीना गावित यांनी अनिल वसावेंचा सत्कार केला.

एव्हरेस्ट वीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल वसावेंची माऊंट एव्हरेस्ट वर चढाई करण्यासाठी निवड झाली. ७ एप्रिल २०२३ ते ७ जून २०२३ या कालावधीत अनिल वसावे ही मोहीम सर करणार आहे. त्यामुळे खा. डॉ. हीना गावित यांनी अनिल वसावेंचा सत्कार केला. अक्कलकुवा सारख्या अतिदुर्गम भागातील बालाघाट या छोट्याशा गावातून पुढे येत अनिल वसावे या युवकाने अनेक आंतरराष्ट्रीय मोहीमा फतेह केल्या आहेत. अशी आंतरराष्ट्रीय कामगिरी करणारा अनिल वसावे हा पहिला आदिवासी युवक असून, त्याने समाजाचे आणि देशाचे नाव उंचावले आहे असे गौरवोद्गार डॉ. हीना गावित यांनी सत्कार प्रसंगी काढले. तसेच एव्हरेस्ट मोहीमेसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Awards: विश्वविजेत्यांचा सन्मान, द्रविड-मिताली राजला जीवनगौरव, तर गिल-मानधना सर्वोत्तम क्रिकेटर; पाहा विजेत्यांनी संपूर्ण यादी

Pune News: व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद, आंबेगाव तालुक्यात हॉटेल व्यवसायिकांमध्ये असंतोष; आठ हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट..

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT