Proposals under Swachh Bharat Mission-2: Work on 'DPR' started; Phase 1 works towards completion esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : घनकचऱ्याचा दुसरा प्रकल्प 32 कोटींचा!

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या वरखेडी रोडवरील कचरा डेपोवर विविध कामे सुरू आहेत. यात प्रामुख्याने बायोमायनिंगचे प्रथम टप्प्यातील काम जवळपास पूर्णत्वाकडे आहे.

दरम्यान, स्वच्छ भारत मिशन-२ अंतर्गत नव्याने दुसऱ्या टप्प्यातील घनकचरा व्यवस्थापनासाठी ‘डीपीआर’चे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील हा प्रकल्प ३१-३२ कोटी रुपये खर्चापर्यंत जाईल असा अंदाज आहे.(Another solid waste project worth 32 crores dhule news)

स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१७ मध्ये धुळे महापालिकेसाठी शासनाने २५ कोटी ८५ लाख रुपये खर्चाचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर केला होता. या प्रकल्पांतर्गत कचऱ्यावर बायोमायनिंग प्रकल्पासह कचरा डेपोवर ऑफिस, पाच शेडची उभारणी, वजनकाटा, डंपर, टँकर खरेदी, ४०० डस्टबिन, फायर एक्स्टिंग्युशर खरेदी आदी विविध कामांचा समावेश होता.

यातील प्रामुख्याने बायोमायनिंगचे काम अद्याप सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ८९ हजार क्युबिक मीटर कचऱ्यावर बायोमायनिंगचे काम सुरू झाले. सुमारे तीन कोटी २५ लाख रुपये खर्चाचे हे काम आहे. ईबी एन्वायरो बायोटेक (नाशिक) या कंपनीकडे हे काम आहे. पहिल्या टप्प्यातील हे काम जवळपास पूर्ण झाले असून, साधारण १० टक्केच काम बाकी असल्याचे महापालिकेचे अधिकारी म्हणतात.

दुसऱ्या टप्प्यात ७५ हजार ६५० क्युबिक मीटर कचऱ्यावर बायोमायनिंगसाठी सुमारे तीन कोटी २२ रुपये खर्चाचे हे काम आहे. पहिल्या टप्प्यातील बायोमायनिंग प्रकल्पाच्या कामातून कचरा डेपोवरील सुमारे तीन एकर जागा रिकामी झाली आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आणखी जागा रिकामी होईल.

दुसऱ्या टप्प्यासाठी डीपीआर

पहिल्या टप्प्यातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत विविध कामे झाली, काही महत्त्वाची कामे सुरू आहेत. दरम्यान, आता स्वच्छ भारत मिशन-२ अंतर्गत धुळे शहरासाठी दुसऱ्या टप्प्यातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावरही काम सुरू आहे. या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.

राज्यस्तरावरून शासनाने यासाठी कंपन्या नियुक्त केल्या होत्या. त्यातील मिटकॉन (पुणे) कंपनीला धुळ्यातील डीपीआरचे काम देण्यात आले आहे. वर्क ऑर्डर देऊन साधारण तीन महिने झाले असून, लवकरच कंपनीकडून डीपीआर सादर होईल, अशी अधिकाऱ्यांना अपेक्षा आहे.

लोकसंख्येवर प्रकल्पाचे गणित

भविष्यात शहरातून निर्माण होणारा कचरा गृहीत धरून डीपीआर तयार करण्यात येत आहे. धुळे शहराची २०२६ ची लोकसंख्या यासाठी गृहीत धरण्यात आली आहे. त्यानुसार साधारण ३१ कोटी ५० लाख रुपये खर्चाचा हा डीपीआर असेल असा अंदाज आहे.

दरम्यान, पहिल्या टप्प्यात समावेश असलेल्या सायंटिफिक लँडफील, प्रोसेसिंग मशिनरी आदी कामे न झाल्याने या कामांचा समावेश दुसऱ्या डीपीआरमध्ये करण्यात आला आहे. सायंटिफिक लँड फिल, प्रोसेसिंग मशिनरी बाकी- दुसऱ्या प्रकल्पात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात सध्या तणावपूर्ण शांतता

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT