नाशिक - कसारा घाटातील भीमा 2 रेल्वे पुलावर गुरुवारी मुंबई-गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसचा घसरलेला डबा. या अपघातानंतर रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती.
नाशिक - कसारा घाटातील भीमा 2 रेल्वे पुलावर गुरुवारी मुंबई-गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसचा घसरलेला डबा. या अपघातानंतर रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती. 
उत्तर महाराष्ट्र

‘अंत्योदय’चा डबा घसरला

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी - मध्य रेल्वेच्या मुंबईहून गोरखपूरला जाणाऱ्या (डाउन) अंत्योदय एक्‍स्प्रेसच्या एका डब्याचे चाक कसारा घाटात गुरुवारी (ता. १८) पहाटे चारच्या सुमारास रुळावरून घसरले. मोठी दुर्घटना टळली असली, तरी घाटमाथ्याच्या वळणावरील ‘भीमा २’ पुलावर हा अपघात घडल्याने, प्रवासी भयभीत झाले. यामुळे रेल्वेसेवा काही काळ विस्कळित झाली होती.

या अपघातामुळे राज्यराणी एक्‍स्प्रेस रद्द करण्यात आली. तसेच दोन्ही मार्गांवरील गाड्या एक ते दीड तास उशिराने धावत होत्या. मुंबईहून गोरखपूरला जाणारी अंत्योदय एक्‍स्प्रेसने (क्रमांक १२५९८) कसारा रेल्वे स्थानक सोडल्यानंतर घाटातील ब्रिटिशकालीन भीमा २ पुलावर येताच मोठा आवाज झाल्याने साखरझोपेत असलेले प्रवासी जागे झाले. गाडीच्या शेवटून दुसरा डबा रुळावरून घसरल्याचे लक्षात येताच चालकाने सतर्कता दाखवत गाडी थांबवली. मात्र अपघातामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. रेल्वे प्रशासनाला घटनेची माहिती समजताच आपत्कालीन यंत्रणेला बोलविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT