medicine sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : जिल्हा नियोजन समितीतर्फे औषध खरेदीला मान्यता; हिरे मेडिकल, सिव्हिलला दिलासा

सकाळ वृत्तसेवा

Dhule News :ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर व नागपूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांतील रुग्णांच्या मृत्यूच्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने रुग्णालयांतील औषध तुटवडा दूर करण्यासाठी वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाऐवजी स्थानिक पातळीवर औषध खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.(Approval of drug purchase by District Planning Committee dhule news)

त्यामुळे येथील हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालयास (सिव्हिल) दिलासा मिळाला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्याकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या आधिपत्याखालील आरोग्य संस्थांसाठी औषधे खरेदी करण्याकरिता महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. या प्राधिकरणामार्फत वैद्यकीय वस्तू व औषध खरेदी करणे अनिवार्य आहे.

मात्र, ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील रुग्णालयांत औषध तुटवडा असल्याचे व रुग्णांच्या मृत्यूस ते एक कारण असल्याचे समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वैद्याकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची ३ ऑक्टोबरला बैठक झाली. त्यात शासकीय रुग्णालयांतील औषधांच्या तुटवड्यासंदर्भात तत्काळ उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले.

त्यानुसार शासकीय रुग्णालयांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त होणाऱ्या निधीतून स्थानिक स्तरावर १०० टक्के औषध खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये, दवाखान्यांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth highway:'शक्तिपीठ महामार्गाच्या आरेखनात बदल नको'; सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा..

Lionel Messi In India : लिओनेल मेस्सी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार नाही; समोर आलं मोठं कारण...

Latest Marathi News Live Update : 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या, धुळे शहर हादरलं

Land Fraud: प्लॉट विक्रीतून ५८ लाखांची फसवणूक; पडेगाव येथील प्रकार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

कसा असेल तुमचा वर्षअखेरीचा महिना? (१ डिसेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५)

SCROLL FOR NEXT