nashik.jpg
nashik.jpg 
उत्तर महाराष्ट्र

कडब्याची यंत्राद्वारे बारीक कुट्टी; दुष्काळात चाऱ्याची व्यवस्था

सकाळवृत्तसेवा

खामखेडा (नाशिक) : अत्यल्प पाऊस व सर्वत्र दुष्काळी परिस्थिती अल्याने जनावरांसाठी पुरेशा चाऱ्याचे उत्पादनही होऊ शकले नाही. डिसेंबर ते जुलै असे आठ महिने लक्षात घेता चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पशुपालक आतापासूनच चाऱ्याची व्यवस्था करत असून मक्याच्या कडब्याची सर्वत्र बारीक भुसा(कुट्टी) करून घेत असतानाचे चित्र पहावयास मिळत आहे.

दुष्काळी परिस्थिती असल्याने पशुधन असलेल्या शेतकऱ्यांसमोर पुढील आठ महिने जनावरांच्या चारा कसा पुरवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांना पावसाळ्यापर्यंत पुरेल इतक्या चाऱ्याची व्यवस्था शेतकरी करतात़ यात मक्याचा कडबा, बाजरी, ज्वारी, दादरयांचे सलग कडब्याची दरवर्षी साठवण करून ठेवतात. मात्र हा सलग कडबा जनावरांना टाकल्यानंतर कडब्याचे जाड पात जनावरांनी चावले जात नसल्याने मोठ्या प्रमाणावर या कडब्याची उगार पडत चाऱ्याची नासाडी होत असते.

त्यामुळे यावर्षी कसमादे भागातील शेतकरी आपल्या जवळील चारा सात आठ महिने पुरेल व नासाडी होणार नाही. यासाठी कडब्याची यंत्राच्या सहाय्याने बारीक भुसा (कुट्टी) करून घेत आहे. या यंत्राद्वारे कडब्याचा बारीक भुसा तयार होत असल्याने जनावरांना वैरण घातल्यावर याची नासाडी होत नाही. त्यामुळे खामखेडा व भागात यावर्षी जवळपास सर्वच शेतकरी चाऱ्याची अश्या पद्धतीने काळजी घेत आहेत. कडबा रचून ठेवल्याने उंदीर व घुशी नासडी करतात मात्र या कुट्टीची साठवण चांगल्या पद्धत्तीने करता येते. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने गहू व रब्बीतील हिरवा चारा उपलब्ध होणार नसल्याने या चाऱ्याची साठवण व काळजी शेतकरी वर्ग घेत आहेत.

''यंत्रावर मक्याचा कडबा, बाजरी, ज्वारी, दादर यांचा बारीक भुसा (कुट्टी) करण्यासाठी व्यावसायिक हजार रुपये तास या दराने आपले यंत्र शेतकऱ्यांकडे देत असतात. तासाभरात दोन ते तीन ट्रक्टर इतका कडब्याची कुट्टी केली जात असल्याने सध्या खामखेडा व परिसरात ह्या व्यावसायिकांना मोठी मागणी आहे. गाय, म्हैस, बैल हि जनावरे कडब्याचा जाड भाग खात नाहीत. त्यामुळे कड्ब्यातील निम्मा भागाची नासाडी होते. कुट्टीने बारीक भुगा असल्याने नासाडी न होता. चारा देखील अधिक दिवस टिकतो.''
- दादाजी बोरसे व सुनिल मोरे, शेतकरी  

.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT