Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : महापालिका वितरित बिलांमध्ये थकबाकीचाही समावेश; नागरिकांना कर भरण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

धुळे : महापालिका हद्दवाढ क्षेत्रातील ११ गावांतील मालमत्तांना महापालिकेच्या महासभेने २०१५ मध्ये मंजूर केलेल्या झोनपैकी सर्वांत कमी दर असलेल्या झोननुसार कर आकारणी केली आहे, असे नमूद करत महापालिकेने हद्दवाढ क्षेत्रातील मालमत्ताधारकांना कर भरण्याचे आवाहन केले आहे. (arrears includes in bills municipal corporation appealed to property owners in delimitation area to pay tax dhule news)

दरम्यान, मालमत्ताधारकांना वितरित बिलांमध्ये थकबाकी रकमेचाही समावेश आहे. ज्यांनी थकबाकी भरली असेल मात्र चालू बिलात त्याचा समावेश झाला असल्यास याबाबत दुरुस्ती केली जाईल, असेही महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

हद्दवाढ क्षेत्रातील मालमत्ताधारकांना धुळे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून या वर्षी सुधारित कर आकारणीनुसार मालमत्ता कर, पाणीपट्टीची बिले वितरित करण्यात आली. दरम्यान, महापालिकेकडून झालेल्या या कर आकारणीवर हद्दवाढ क्षेत्रातील मालमत्ताधारकांनी नाराजीसह आक्षेप घेतला आहे.

हद्दवाढ क्षेत्रात सोयी-सुविधांची वानवा असताना महापालिकेकडून आकारण्यात आलेला कर अवास्तव व जास्त असल्याचे मालमत्ताधारकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही बिले मागे घ्यावीत व पूर्वीप्रमाणे बिले द्यावीत, अशी मागणी पुढे आली आहे. या मागणीच्या अनुषंगाने काही नागरिकांनी आंदोलनही केले, आयुक्तांना निवेदन दिले.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

दरम्यान, या सुधारित कर आकारणीच्या विषयावर आता राजकीय पक्षांकडून टीका होत आहे. दरम्यान, आता महापालिका प्रशासनाकडून हद्दवाढ क्षेत्रातील मालमत्ताधारकांना कर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे आवाहन करताना हद्दवाढ क्षेत्रात लागू कराबाबतही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

हद्दवाढ क्षेत्रातील ११ गावांत जीआयएस मॅपिंगद्वारे मालमत्तांचे मोजमाप करण्यात आले असून, महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार २०२२-२३ ची मालमत्ता कर व पाणीपट्टी कराची मागणी देयकांबाबत मालमत्ताधारकांच्या मोबाईलवर संदेश देण्यात आला आहे. मागणी बिलेही प्रत्यक्ष घरी जाऊन वाटप करण्यात येत आहेत.

सर्वांत कमी दर

मालमत्ता कराची आकारणी २०१५ मध्ये महासभेने ए बी, सी झोननुसार मंजूर केलेल्या दरातील सर्वांत कमी अर्थात ‘सी’ झोननुसार आकारणी करण्यात आली आहे. तसेच शासन आदेश व अधिनियमातील तरतुदीनुसार २०१९-२० साठी २० टक्के, २०२०-२१ साठी ४० टक्के, २०२१-२२ साठी ६० टक्के व २०२२-२३ साठी ८० टक्के याप्रमाणे मागणी बिले देण्यात येत आहेत.

चूक असल्यास दुरुस्त करू

ग्रामपंचायतीच्या आकारणीनुसार थकबाकीची रक्‍कम बिलात समाविष्ट करण्यात आली आहे. दरम्यान, थकबाकीची रक्‍कम भरली असेल मात्र २०२२-२३ च्या बिलात या थकबाकीचा समावेश झाला असल्यास भरलेल्या पावत्या सादर करून, तसेच नावात किंवा इतरबाबत बिलात अनवधानाने चूक झाली असल्यास त्यासंबंधी मालमत्ताधारकांकडून अर्ज घेऊन, त्यासंबंधीचे पुरावे (वापर प्रमाणपत्र, बांधकाम मंजुरीचे पत्र) सादर करून दुरुस्ती (वाढ, घट) करण्याची तजवीज करण्यात आली असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर भरून धुळे महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT