Dhule: Police detaining a citizen who attempted self-immolation in front of the Collector's office on Republic Day for the demand of City Survey copy esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : City Survey उताऱ्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

धुळे : सिटी सर्व्हे उतारे मिळावेत या मागणीसाठी धुळे शहरातील मिल परिसरातील तुळसाबाईचा मळा येथील रहिवाशांनी प्रजासत्ताकदिनी (ता. २६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. घोषणाबाजी करत अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून घेताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

धुळे शहरातील मिल परिसर चितोड रोड भागातील तुळसाबाईचा मळा येथे ३५-४० वर्षांपासून रहिवास असलेल्या नागरिकांना घरांचा सातबारा मिळावा, अशी मागणी आहे. तेथील रहिवासी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच भूमिअभिलेख कार्यालयाकडे सातत्याने मागणी करत आहेत. (Attempted self immolation for City Survey passage Protest by residents of Tulsi Mala on Republic Day Dhule News)

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

मात्र, आमच्या या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत संतप्त रहिवाशांनी प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मदहनाचा इशारा दिला होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर रहिवाशांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

बंदोबस्तावरील पोलिसांनी आंदोलकांना अडविले व त्यांच्याकडील डिझेलच्या बाटल्या हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, या वेळी यातील काही आंदोलकांनी स्वतःच्या अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

त्यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. विनोद जगताप, सुनील ठाकूर, विशाल केदार, प्रवीण मराठे, योगेश चौधरी, अनिल मुसमुडे, मनोज मोरे, नीलेश पवार यांच्यासह सर्व आंदोलकांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: कामासाठी इमारतीमध्ये गेले; पण कुत्रा मागे लागला अन्...; सारंच संपलं! पुण्यात 'त्या' इलेक्ट्रिशियनसोबत काय घडलं?

Ahilyanagar : एबी फॉर्म मिळवून अर्ज भरला, पक्षानं काढून टाकलं, चोरीचा ठपका ठेवत शिस्तभंगाची कारवाई

अखेर तेजश्रीने करून दाखवलंच! 'वीण दोघातली...'ची टॉप ५ मध्ये एंट्री; स्टार प्रवाहच्या या मालिकांचा TRP घसरला, कोण कितव्या स्थानी?

Stock Market Today : आज भारतीय शेअर बाजार विक्रमी पातळीच्या जवळ बंद; सेन्सेक्स तब्बल 446 अंकांनी वाढला; हे शेअर्स फायद्यात!

Latest Marathi News Update LIVE : अनिल देशमुखांच्या मुलाचा शरद पवार गटाला रामराम

SCROLL FOR NEXT