Landslides causing accidents near bridges. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Accident News : वाहतुकीची वाट अरुंद; मातीच्या ढिगाऱ्यांनी घेतला चालकाचा बळी

सकाळ वृत्तसेवा

Dhule Accident News : गिधाडे (ता. शिरपूर) येथील तापी नदीच्या पुलाजवळ पडलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरून तीनचाकी मालवाहू रिक्षा उलटून चालक ठार झाला. हा अपघात ५ डिसेंबरला दुपारी साडेतीनला घडला.

मातीच्या ढिगाऱ्यांमुळे पुलाजवळ वारंवार अपघात होत असूनही संबंधित विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम मानवी बळी जाण्यात झाल्याच्या प्रतिक्रिया वाहनचालकांतून देण्यात आल्या.(auto driver was death by debris dhule accident news)

शरद मंगल पाटील (वय ३५, रा. पिंपरकोठा, ता. धरणगाव, जि. जळगाव) असे मृत चालकाचे नाव आहे. तो सध्या सुरत (गुजरात) येथे राहत होता. तो तीनचाकी मालवाहू रिक्षा (एमएच १९, जीएच ८४८२)ने शिंदखेड्याकडून शिरपूरकडे येत होता. तापी नदीवरील पूल ओलांडल्यावर गिधाडे गावाजवळ रस्त्यावर पडलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरून रिक्षाचे चाक गेले.

त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटली. अपघातात शरद पाटील गंभीर जखमी झाला. त्याला दुसऱ्या वाहनचालकाने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. शहर पोलिसांनी अपघाताची नोंद केली.

जीवघेणे ढिगारे

काही दिवसांपूर्वी तापी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाची सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती केली. त्या वेळी वापरण्यात आलेल्या मुरूममिश्रित मातीचे ढिगारे अद्यापही उचलण्यात आलेले नाहीत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ढिगारे असल्याने वाहतुकीची वाट अरुंद झाली आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन वाहने जाऊ शकत नाहीत.

ढिगाऱ्यावरून चाक गेल्याने तेथे अनेकदा वाहनांचे अपघात घडतात. याबाबत वारंवार ओरड होऊनदेखील माती हटविण्याचे काम झालेले नाही. सध्या हा पूल अवजड वाहनांसाठी बंद असून, शिरपूर-शिंदखेडामार्गे जाणाऱ्या बसची वाहतूकही दभाशीमार्गे सुरू आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, दुचाकी मात्र याच रस्त्यावरून जातात. आणखी अपघात होऊ नयेत यासाठी मातीचे ढिगारे तातडीने हटवावेत, अशी मागणी वाहनचालकांतून केली जात आहे.

''पुलाच्या अलीकडे असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे विविध समस्या येतात. अवकाळी पावसानंतर या ढिगाऱ्यातील माती रस्त्यावर वाहून आल्याने चिखलामुळे रस्ता निसरडा झाला होता.

समोरासमोरून दोन वाहने एकाच वेळी जाऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. विशेषत: रात्री ढिगाऱ्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात घडतात. यावर तातडीने उपाययोजना होणे आवश्यक आहे.''-ज्ञानेश्वर पाटील, रिक्षाचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta Announcement: 'जनसुनावणी'वेळी झालेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Ajinkya Rahane नंतर कोण होणार मुंबईचा कर्णधार? श्रेयससोबत शर्यतीत ३३ वर्षीय खेळाडू; MCA कडे आहेत 'हे' तीन पर्याय

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

SCROLL FOR NEXT