Boys-Beating-To-Girl
Boys-Beating-To-Girl 
उत्तर महाराष्ट्र

तरुणीला चापट, लाथा-बुक्क्‍यांनी मारहाण

सकाळवृत्तसेवा

जळगाव - शहरातील गोलाणी संकुलात वर्दळीच्या ठिकाणी एका विशीतील तरुणीला तिचा मित्र, लाथा-बुक्क्या, चापटांनी मारहाण करीत असल्याची घटना आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळावर होती. मात्र, एकही जण तरुणीच्या मदतीसाठी पुढे सरसावला नाही. काही सुज्ञ नागरिक, संघटनांचे पदाधिकारी जणू मूकसंमती देत तमाशा बघत राहिले. नंतर दोघा तरुणांनी या तरुणीला बळजबरी दुचाकीवर बसवून शिवतीर्थ मैदानाजवळ नेऊन तेथेही मारहाण केली. यावेळी पोलिस धडकले अन्‌ तरुणीला सोडविले.  

शहरात मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गोलाणी व्यापारी संकुलातील ‘ई-विंग’च्या पहिल्या मजल्यावर फिक्कट गुलाबी टॉप आणि लेगीज्‌ परिधान केलेली तरुणी व तिच्या मागोमाग दोन तरुण शिरले. दोघा तरुणातील एकाची ती प्रेयसी..मैत्रीण किंवा त्यापैकी कुणीतरी असल्याच्या हक्कात तो वावरत होता...कधी शिवीगाळ करून कधी थांबवून तो तिला जाब विचारून त्रास देत होता..कधी कानशीलात लगावून, नंतर ती पुढे पळून जाताना तिच्या पाठीवर गुद्धा हाणून या तरुणीला तो सारखा मारत होता. ती...हुंदके देत रुमालाने तोंड पुसतच सर्व सहन करीत होती. गोलाणी मार्केटमध्ये जवळपास पाऊणतास हा ‘लव का तमाशा’ सुरू होता...मात्र, दोघांच्या मध्ये कोणी बोलेल किंवा तिला, का? मारतोय अशी विचारण्याची साधी हिंमत कोणी केली नाही. विशेष म्हणजे कायद्याचे जाण असलेले..काही पक्षातील कार्यकर्ते देखील हा तमाशा उघड्या डोळ्यांनी बघत होते. काही वेळाने तरुणीला पुढे-पुढे ढकलत हे दोघे तरुण तिला अमर रगडा दुकानाजवळ उभ्या दुचाकीजवळ घेऊन आले. दोघेही दुचाकीवर बसले. नंतर त्यांनी या तरुणीला बसण्यास सांगितले. ती नकार देत असताना बळजबरीने तिला बसवून घेऊन गेले. शिवाजी पुतळ्याजवळील शिवतीर्थ मैदानावर हा तमाशा पुन्हा सुरू होऊन या तरुणीला त्या भामट्या पुन्हा मारहाण करीत असल्याचे बघितल्यावर एका छायाचित्रकाराने अखेर जिल्हापेठ पोलिसांना फोन करून घटना कळविली. पोलिस आले व त्या तिघांना पोलिस ठाण्यात घेऊन गेले. 

पोलिसांनी तरुणांना घेतले ताब्यात 
मारहाण करणारे दोघे तरुण शहरातील लिधूरवाडा येथील, तर तरुणी शनिपेठेतील आहे. शिवतीर्थ मैदानावरून या तिघांना उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांनी हटकल्यावर तरुणीने आधी.. मारहाण करणाऱ्याच्या दबावातच आमचे आपसातील भांडण असल्याचे सांगितले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी तिघांच्या पालकांना बोलावून समजपत्रावर कायदेशीर समज देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT