esakal
esakal
उत्तर महाराष्ट्र

Unique Wedding : ‘हौसेला मोल नसते’... विवाह सोहळा ठरला चर्चेचा विषय!

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : ‘हौसेला मोल नसते’ अशी म्हण आहे. कोण कशाची हौस करेल याचे सांगता येत नाही. अशीच एक हौस नवरदेवाच्या पित्याने केली असून, हा नंदुरबार जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

लग्न लागण्यापूर्वी वरपित्याने आपला मुलगा (Son) व वधू सूनबाई यांना शहरातून हेलिकॉप्टरने सफर घडविली. (Before marriage father in law arranged for his son and bride to travel in helicopter from city nandurbar news)

नंदुरबार शहरातील राजपूत समाजाध्यक्ष मोहिनीराज राजपूत यांचा मुलगा हंसराज याचा विवाह सोहळा जैनाबाद (ता.जि. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) येथील विजयसिंग राजपूत यांची कन्या रितिका हिच्याशी मंगळवारी गोरज मुहूर्तावर पार पडला. तत्पूर्वी वरपिता मोहिनीराज राजपूत यांनी हौसेखातर मुलगा हंसराज व नववधू सूनबाई रितिका हिला शहरातून हेलिकॉप्टरने सफर घडवून आणली.

३८ वर्षांनंतर मुलगा झाल्याने वाटली होती हत्तीवरून साखर

नवरदेव पिता मोहिनीराज राजपूत यांना लग्नानंतर तब्बल ३८ वर्षांनंतर पुत्ररत्न प्राप्त झाले. पुत्ररत्नाच्या आनंदाने त्या वेळी त्यांनी श्रीक्षेत्र शेगावहून हत्ती मागविला होता आणि त्या हत्तीवरून नंदुरबारात नातेवाईक, मित्रमंडळ व आप्तेष्टांना साखरवाटप केल्याचे नवरदेव पिता मोहिनीराज राजपूत सांगतात.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

...अन् मनात आला हेलिकॉप्टरच्या विचार

नवरदेव पिता मोहिनीराज राजपूत यांना ३८ वर्षांनंतर पुत्ररत्न प्राप्त झाले होते. त्याच वेळी त्यांनी मुलाचा लग्नसोहळा आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्याचे ठरविले होते. मोहिनीराज राजपूत यांनी अनेक लग्नसमारंभांना हजेरी लावली.

अनेक लग्नसमारंभांमध्ये भव्यदिव्य आरास, स्टेज, शाही विवाह त्यांनी पाहिले; परंतु यापेक्षाही मुलगा हंसराज याचा विवाह अनेकांच्या स्मरणात राहील असे करून दाखविण्याचा निर्धार केला अन् मुलाचे लग्न लागण्यापूर्वी नवदांपत्यास शहरातून हेलिकॉप्टरची सफर घडवून आणण्याच्या चंग बांधला. त्यानुसार, मंगळवारी गोरज मुहूर्तावर लग्न लागण्यापूर्वी दुपारी हेलिकॉप्टरमधून नवदांपत्यास सफर घडवून आणली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

Elvish Yadav : रेव्ह पार्टीनंतर एल्वीश पुन्हा अडचणीत ; मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT