उत्तर महाराष्ट्र

पूर्ववैमनस्यातून भुसावळात तरुणावर तलवार हल्ला 

सकाळ वृत्तसेवा

जळगावः दोन दिवसापूर्वीच वादावरून भुसावळ येथील महामार्गावरील सुहास हॉटेल समोरतलवार तरुणावर तलवार हल्ला झाल्याची घटना आज (ता.24) दुपारी अडीच वाजाच्या सुमारास घडली. तरुणाच्या अंगावर आधी मिरचीपुड, पेट्रोल टाकून तलवारचा वार करण्यात आला. या घटनेत तरुणाचा डाव्या हातावर गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर जळगाव जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. 

दुकान गाळ्याच्या कारणावरून प्रशांत चौधरी (वय 30) याच्या वडीलांचे काही तरूणांशी दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. नंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले मात्र, या प्रकरणात प्रशांत याच्याविरूध्दही बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. लहान भाऊ डिगंबर याने पोलीस ठाण्यात जमा होण्याचा सल्ला दिला. म्हणून तो लहान भावाची दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भुसावळ महामार्गावरील सुहास हॉटेलसमोर वाट बघत होता. त्याचवेळी अचानक आठ ते दहा तरूणांनी प्रशांतला घेरून लाकडी दांड्याने मारहाण केली तर मिरची पूड व पेट्रोल अंगावर टाकले. 

तलवारने हातावर केला वार 
लाकडी दांड्यांनी मारहाण करत असतांना एकाने प्रशांतच्या डाव्या हातावर तलवारने वार केला. त्यात प्रशांतच्या बोटाला गंभीर दुखापत झाली काही वेळानंतर मोठ्या भावाला मारहाण झाल्याचे कळताच लहान भाऊ डिगंबर याने घटनास्थळी धाव घेवून भावाला रूग्णालयात नेले. त्यानंतर जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ जळगावला आणले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT