उत्तर महाराष्ट्र

नवापूरला चिकन, अंडी विक्रीला बंदी; कोंबड्यांचा मृत्यूमुळे  प्रशासनाची धावपळ 

विनायक सुर्यंवशी

नवापूर : पोल्ट्रीफार्मच्या कोंबड्यांचा मृत्यू संसर्गजन्य आजाराने होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना तोंडी आदेशाने पालिका प्रशासनाने शहरातील चिकन व अंडी विक्री करण्यास मनाई केली. बावीस पोल्ट्रीफार्मला प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून सील करण्याचे आदेश पारित केले. तीन दिवसांत सात हजार कोंबड्यांचा संसर्गजन्य आजाराने मृत्यू झाल्याने प्रशासन कामाला लागले आहे. 

तालुक्यातील पोल्ट्रीफार्मच्या कोंबड्यांचा हजारोंच्या संख्येने मृत्यू संसर्गजन्य आजाराने होत आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तालुक्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन उपाययोजनांसंदर्भात सूचना केल्या. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, प्रांताधिकारी वसुमना पंत, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी चार सील केलेल्या डायमंड, परवेज पठाण आणि व्होरा या पोल्ट्रीफार्मची पाहणी केली. पालिका प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार शुक्रवारी आरोग्य निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी शहरातील चिकन व अंडी विक्रेत्यांना विक्री करण्यास मनाई केली. दरम्‍यान, ‍शहरात बर्ड फ्लू नसतानाही आमच्या व्यवसायावर बंदी का, असा सवाल उपस्थित करत चिकन व अंडी विक्रेत्यांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. 

शुक्रवारी साडेतीन हजार कोंबड्यांचा मृत्यू 
जिल्हाधिकाऱ्यांनी नवापूर शहरातील एक किलोमीटर परिघातील २२ कुक्कुटपालन पालन व्यवसायाला प्रतिबंधनात्मक उपाययोजना म्हणून सील करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. सर्व ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. तालुक्यातील सर्व पोल्ट्रीफार्ममध्ये नऊ लाख पक्षी आहेत. पैकी शुक्रवारी साडेतीन हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला. तीन दिवसांत सात हजार कोंबड्यांचा संसर्गजन्य आजाराने मृत्यू झाला आहे.  

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी अपडेट! राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ दोषमुक्‍त; ‘महाराष्‍ट्र सदन’प्रकरणी न्यायालयाचा निर्णय..

Uday Samant: दावोस येथे राज्याचा गुंतवणुकीचा विक्रम: उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, दौऱ्यात एकूण ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार!

Kolhapur Politics : काठावरचे बहुमत, ‘दे धक्का’ची धास्ती! महापालिकेतील महायुतीसमोर पाच वर्षांचे मोठे आव्हान

Latest Marathi news Live Update: कोराडी औष्णिक वीज प्रकल्पातील फ्लाय अॅश प्रकरणी महाजेनकोला मोठा दंड

दहावीला ९९ टक्के, नीट परीक्षेत कोकणात अव्वल; डॉक्टर व्हायचं होतं, पण २०व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप

SCROLL FOR NEXT