bird flu poultry 
उत्तर महाराष्ट्र

नवापूरने 'बर्ड फ्लू'चा घेतला धसका; प्रशासन ‘हाय अलर्ट’वर 

विनायक सुर्यंवशी

 
नवापूर : शहरासह तालुक्यातील पोल्ट्रीफार्मच्या हजारो कोंबड्यांचा मृत्यू संसर्गजन्य रोगाने होत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रांताधिकाऱ्यांसह पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांनी भेट दिली. कुक्कुटपालन व्यावसायिकांची बैठक घेऊन खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. 
दरम्यान, पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने मृत कोंबड्यांचे नमुने पुणे व भोपाळला पाठविले आहेत. अहवाल येईपर्यंत सतर्कता म्हणून जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांनी पोल्ट्रीफार्मच्या आजूबाजूच्या २२ गावांना हाय अलर्ट जारी केला आहे. 

कुक्कुटपालन केंद्रांची पाहणी व चौकशी सुरू आहे. नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुरुवारी नवापूर तालुक्यातील पोल्ट्रीफार्मला नाशिकच्या पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ. बाबूराव तरवाडे, सहाय्यक आयुक्त डॉ. शहाजी देशमुख, सहाय्यक आयुक्त डॉ. जी. आर. पाटील, पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. बी. पाडवी, डॉ. अमित पाटील, डॉ. योगेश गायित, डॉ. के. डी. पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. यू. डी. पाटील यांनी भेट देऊन चौकशी केली. चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी मृत कोंबड्याची व्हिलेवाट कशी लावावी यावर मार्गदर्शक सूचना केल्या. कोंबड्यांचा मृत्यूबाबत माहिती लपविणाऱ्या पोल्ट्रीमालकावर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

आवर्जून वाचा- राज्यपालांसमोर भाजपच्या लोकप्रतिनिधींचे ‘पॉलिटिकल रडगाणे' ! 

प्रांताधिकारी वसुमना पंत यांनी तहसील कार्यालयात सर्व पोल्ट्री व्यावसायिकांची बैठक घेतली. कोंबड्यांचा मृत्यू कोणत्या आजाराने झाला, हे निष्पन्न होत नाही तोपर्यंत खबरदारी घ्यावी. कुठल्याही प्रकारची बेपर्वाई प्रशासन खपवून घेणार नाही. संसर्गजन्य आजाराबाबत हलगर्जी व माहिती लपविली तर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. तहसीलदार मंदार कुलकर्णी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, २४ पोल्ट्री व्यावसायिक उपस्थित होते.  

 
संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Victim Father Statement: “माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत येऊ नका” नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी राजकीय नेत्यांना फटकारलं

Shrirampur Crime: प्रेमसंबंधाच्या वादातून पोटच्या मुलाकडून वडिलांचा खून; श्रीरामपुरात धक्कादायक घटना, घरगुती कलहाचा थरारक शेवट!

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा ठराव पूर्ण गावानेच घेतला, सांगली जिल्ह्यातील शेतकरी नितीन गडकरींची घेणार भेट

Education Success Story: शेतमजूर कुटुंबातील मयुरी लावंडची झेप; बारावीत ८६% गुणांसह कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

Delhi Judge Endlife : बाबा, मी आता जगू शकत नाही... ३० वर्षीय न्यायाधीशाने गळफास घेऊन संपवले जीवन, धक्कादायक कारण आले समोर

SCROLL FOR NEXT