उत्तर महाराष्ट्र

नवापूर तालुक्यात सोळा पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह 

विनायक सुर्यंवशी

नवापूर: तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर बाधित दहा कुक्कुटपालन केंद्रातील पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मंगळवारी (ता.९) रात्री उशिरा आलेल्या आठ पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आत्तापर्यंत १६ पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्यापैकी दहा पोल्ट्री फार्मच्या पक्ष्यांचे किलिंगचे काम बुधवारी सायंकाळी पूर्ण झाले. बुधवारी प्रशासनाने तालुक्यातील सर्व पोल्ट्री फार्मचे कोंबडी खाद्याचे गुदाम सील केल्याची माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली. 


मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात लहान चिंचपाडा व पिंपळनेर रस्त्यावरील मुस्तफा १ व २, श्रेयश, सफा, न्यू शांती, एफ-सन्स, जस व शाहीन या आठ पोल्ट्री फार्मचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आत्तापर्यंत सोळा पोल्ट्री फार्मच्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. लागण झालेल्या पोल्ट्री फार्मच्या आजूबाजूच्या एक किलोमीटर परिघातील घरगुती पालन केलेल्या कोंबड्या, बदक व इतर पाळीव पक्षी जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिलेल्या आदेशानुसार घरगुती पक्ष्यांच्या मालकांना शासन नियमानुसार भरपाई मिळणार आहे. नागरिकांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे आपल्या कोंबड्या, बदक पाळीव पक्षी देताना सोबत आधारकार्ड व इतर आवश्यक माहिती द्यावी, जेणेकरून भरपाई मिळताना अडचणी निर्माण होणार नाही, असे तहसीलदार श्री. कुलकर्णी यांनी सांगितले. 

सव्वातीन लाख कोंबड्याचे किलिंग 
आदेशानंतर पहिल्या दिवशी ४० हजार कुक्कुट पक्षी नष्ट केले. दुसऱ्या दिवशी एक लाख ५ हजार ३०३, तिसऱ्या दिवशी ८४ हजार ७८७, तर बुधवारी चौथ्या दिवशी पालावाला पोल्ट्री फार्मच्या ५९ हजार सहाशे, मुस्तफा- एकमध्ये २३ हजार २५१, श्रेयस पोल्ट्रीच्या चार हजार २००, तर न्यू डायमंडमध्ये २५ हजार २४१ अशा एकूण एक लाख १२ हजार २९२ पक्ष्यांचे किलिंग झाले. आजपर्यंत तीन लाख २८ हजार २५१ पक्ष्यांचे किलिंगचे काम पूर्ण झाले आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT