उत्तर महाराष्ट्र

जैताणेत 'राजीनाम्याच्या' दिवशीच 'पक्षाला' जीवदान.!

प्रा.भगवान जगदाळे

निजामपूर-जैताणे (धुळे) : 'राजीनाम्याच्या दिवशीच पक्षाला जीवदान' हे ऐकून थोडे गोंधळात पडल्यासारखे वाटते. एका बाजूला 'राजीनामा' तर दुसऱ्या बाजूला 'पक्षाला' जीवदान.! परंतु हे जीवदान काही एखाद्या राजकीय पक्षाला नव्हे, तर एका अडकलेल्या जखमी पक्षाला मिळाले आहे. तेही सरपंच संजय खैरनार यांच्यामुळे. राजीनाम्याच्या दिवशीच योगायोगाने एका पक्षाला जीवदान दिल्याने सरपंच खैरनार यांनी समाधान व्यक्त केले आहे.

शुक्रवारी सकाळी दहाला जैताणेचे सरपंच संजय खैरनार यांचा राजीनामा पडताळणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सदस्यांची विशेष सभा बोलाविण्यात आली होती. ती विशेष सभा आटोपल्यानंतर सरपंच खैरनार ग्रामपंचायतीच्या प्रांगणात कार्यकर्त्यांशी चर्चा करत उभे होते. तेवढ्यात अचानक एका पांढऱ्या शुभ्र बगळ्याच्या पिलावर त्यांची नजर पडली.

त्या बगळ्याच्या पिलाचे पाय शेजारील इमारतीच्या खिडकीत अडकल्याने ते फडफडत होते. फडफड करत ते अक्षरशः अर्धमेले झाले होते. त्यांनी धावतच त्या अडकलेल्या पक्षावर दया व सहानुभूती दाखवत त्याची तातडीने सुटका केली. त्यानंतर सरपंच खैरनार यांनी त्या बगळ्याच्या जखमी पिलाची सेवासुश्रुषा केली व त्यास आकाशात उंच भरारी घेण्यास मुक्त सोडले. यावेळी गटनेते ईश्वर पेंढारे, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर न्याहळदे, ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड, लिपिक यादव भदाणे, भाऊसाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.

"राजीनामा दिल्यानंतर जबाबदारीचे ओझे थोडेसे कमी झाले आहे. राजकीय पदाचा त्याग करताना मनोमन वाईटही वाटते. पण जितक्या सहजतेने मी या पक्षाला आकाशात सोडले. तेवढ्याच सहजतेने मी गावाचे सरपंचपदही सोडले आहे. बगळ्याच्या पिलाला आकाशात सोडून सरपंचपदाचा त्याग केला याचा मनस्वी आनंद होत आहे." अशी अनोखी प्रतिक्रिया सरपंच खैरनार यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT