Hemant-Shetty 
उत्तर महाराष्ट्र

भाजप नगरसेवक शेट्टीविरोधात तडीपारीचा प्रस्ताव

सकाळवृत्तसेवा

नाशिक - ज्वाल्या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार व भाजपचे नगरसेवक हेमंत शेट्टी आणि वाघ खून प्रकरणातील संशयित अजय बागूल यांच्यासह पंचवटीतील 21 सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यावर लवकर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे. शेट्टीप्रमाणे बागूल हे भाजपशी संबंधित आहेत. गंभीर गुन्हे दाखल असलेले पण राजकारणात "व्हाइट कॉलर' होऊ पाहणाऱ्यांच्या गुन्हेगारी कुंडल्या पुन्हा उचकल्या जात असून, त्यांच्याविरोधात पोलिसांकडून तडीपारीचे प्रस्ताव होत आहेत.

पंचवटीतील सराईत गुन्हेगार ज्वाल्या ऊर्फ जालिंदर उगलमुगले याचा 2015 मध्ये हेमंत शेट्टीने राकेश कोष्टी, कुंदन परदेशी, अविनाश कौलकर यांच्यासह साथीदारांच्या मदतीने इगतपुरीच्या जंगलात खून केला होता. दोन ते अडीच वर्षांनंतर या खुनाची उकल झाली. याप्रकरणी हेमंत शेट्टीला पंचवटी पोलिसांनी अटक केली होती. सध्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जामिनावर असलेल्या शेट्टी विरोधात पंचवटी पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पोलिस उपायुक्तांकडे सादर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT