जनशताब्दी एक्‍स्प्रेसमध्ये संत्रा-लेमन गोळ्या विकताना दिव्यांग बेरोजगार पदवीधर शिक्षक अब्दुल मणियार.
जनशताब्दी एक्‍स्प्रेसमध्ये संत्रा-लेमन गोळ्या विकताना दिव्यांग बेरोजगार पदवीधर शिक्षक अब्दुल मणियार.  
उत्तर महाराष्ट्र

आईसाठी दिव्यांग बेरोजगार पदवीधर शिक्षकाचा जीवघेणा प्रवास

विजय बोऱ्हाडे

सिन्नर - ‘संत्रा-लेमन गोलीऽऽ... आस्मानतारा गोलीऽऽऽ.. बोलो टाइमपासऽऽऽ...’ रेल्वेच्या प्रवाशांसाठी नवी नसलेली, स्वतःच्या पहाडी आवाजात ही हाक गुंजते ती जनशताब्दी एक्‍स्प्रेसमध्ये नाशिक रोड ते दादर या रेल्वेप्रवासात. ही हाक देतोय तो बेरोजगार दिव्यांग शिक्षक अब्दुल मणियार तेही आपल्या आईच्या उपचारासाठी. 

राज्यात डी.एड.-बी.एड. शिक्षकांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. हे बेरोजगार शिक्षक सोशल मीडिया, आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षकभरती व्हावी यासाठी जिवाचे रान करताहेत. मात्र, पत्रावळीत मश्‍गुल असलेला शिक्षण विभाग निर्णयावर आपलीच पाठ थोपटून घेण्याचे काम करीत आहे. मश्‍गुल सरकारच्या कारकीर्दीत शिकून हार न मानणारे बेरोजगार शिक्षक जीवन जगण्यासाठी स्वत:च रोजगाराचा मार्ग शोधत आहेत. त्यातील एक दिव्यांग अब्दुल मणियार. 

इयत्ता पहिलीपासून बी.ए., डी.एड.पर्यंतचे नाशिकच्या अंधशाळेत शिक्षण घेतलेला अब्दुल मणियार. पहाटे साडेपाचला उठून एक तासात मऱ्हळहून सिन्नरला निघतो. साडेसातला सिन्नरला पोचल्यावर नाशिक रोड रेल्वेस्थानकापर्यंत जाणाऱ्या पालघर बसने तो नाशिक रोड गाठतो. तोपर्यंत आठ वाजून ५० मिनिटे झालेली असतात. जालना-दादर ही जनशताब्दी एक्‍स्प्रेस नाशिक रोड स्थानकात पोचलेली असते. रेल्वेगाडी प्लॅटफॉर्मवर नियोजित जागी थांबून बरोबर डब्यात चढून हातात अंधांची काठी. दोन्ही खिशांत लेमन, आस्मानताराच्या गोळ्यांची पाकिटे भरून हातात मावेल इतकी पाकिटे ठेवून अब्दुलचा श्रीगणेशा होतो. संत्रा-लेमन गोलीऽऽ.. आस्मानतारा गोलीऽऽऽ.. बोलो टाइमपासऽऽऽ...७० टक्के लोक सहानुभूतीने, तर ३० टक्के लोक गरजेने गोळ्यांची खरेदी करतात. दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी ही गाडी दादरला पोचते. या स्थानकावर उतरून तेथेच घरून आईने पहाटे उठून बनविलेला जेवणाचा डबा खाऊन थोडा आराम करतो.

पुन्हा दोनला हीच जनशताब्दी एक्‍स्प्रेस परतीच्या प्रवासाला निघते. पुन्हा रेल्वेगाडीत गोळ्यांची विक्री करीत सायंकाळी साडेपाचला नाशिक रोडला येतो. कुणाच्या तरी आधाराने अब्दुल गाडीतून बाहेर पडून नाशिक रोड बसस्थानक गाठतो. साडेसहाला सिन्नरला पोचलेला अब्दुल बसस्थानकाबाहेर चहा घेतो आणि पावणेसातच्या मऱ्हळ गाडीत बसून पावणेआठपर्यंत घरी पोचतो. ‘माँ...दवाई ली थी क्‍या... माँ आज बहुत जल्दी माल खत्म हो गया...माँ कल थोडा जादा माल देना... अशा आवाजाने सांधेदुखीच्या आजाराने त्रस्त अब्दुलची आई शहेनाज मणियार यांचे नित्याने डोळे पाणवतात. दररोजचा पाचशे किलोमीटरचा प्रवास आणि जवळपास १३ तासांचा वेळ खर्ची करून अब्दुलच्या हातात येतात ते अडीचशे ते तीनशे रुपये. त्यातील दररोज ४० रुपये बसभाड्यात खर्च होतात. विशेष म्हणजे, खूप वेळा माणुसकी आणि सहानुभूतीवर अब्दुलचा माल संपलेला असतो. त्याच्या दररोजच्या प्रवासात सिन्नरचे पोस्टमन बाळासाहेब दराडे, महिला वाहक दिशा आंधळे या त्याच्या बसप्रवासाला मदत करतात. एका महिलेने माझी चौकशी करत माझ्याकडून पाचशे रुपयांची गोळ्यांची पाकिटे विकत घेतल्याचे तो आवर्जून सांगतो.

बी.ए.,डी.एड.पर्यंतचे शिक्षण अंधशाळेत झाले असले, तरी आम्हा अंधांना नोकऱ्या नाहीत. शासन आश्‍वासनापलीकडे काहीच करीत नाही. नोकरी नसल्याने कुणी मुलगी देत नाही. आईला घरात आधार म्हणून अनेक डोळस मुलीही लग्नाला तयार झाल्या; परंतु नोकरी नसल्याने नाकारले.
- अब्दुल गुलाब मणियार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT