Dead  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : खळबळजनक! विरदेलला अल्पवयीन मुलीचा गोणपाटात सापडला मृतदेह

तिचा मृतदेह रविवारी (ता. ११) सायंकाळी विरदेल गावशिवरात गोणपाटात सापडल्याने एकच खळबळ उडाली.

सकाळ वृत्तसेवा

चिमठाणे : विरदेल (ता. शिंदखेडा) येथील १४ वर्षे सात महिने सहा दिवस वय असलेली मुलगी ५ फेब्रुवारीपासून कोणीतरी अज्ञाताने पळवून नेल्याचा गुन्हा शिंदखेडा पोलिस ठाण्यात दाखल झाला होता.

तिचा मृतदेह रविवारी (ता. ११) सायंकाळी विरदेल गावशिवरात गोणपाटात सापडल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांना प्रथमदर्शनी खून झाला असावा, असा संशय व्यक्त केला येत आहे. (Body of minor girl found in sack in Virdel Dhule News)

विरदेल येथील विठ्ठल मान्या ठाकरे (वय ५२) यांची मुलगी ५ फेब्रुवारीला सकाळी गावशिवरातील शेतात वडिलांचा डबा देऊन घरी गेली. मात्र ती घरी गेली नाही म्हणून तिचा अक्कडसे, सोनवाडी, हिसपूर, चिलाणे, दलवाडे (प्र. नंदुरबार) गावात शोध घेतला असता ती मिळून आली नाही.

याबाबत ६ फेब्रुवारीला शिंदखेडा पोलिस ठाण्यात तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद वडील ठाकरे यांनी दिल्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रविवारी सायंकाळी विरदेल शिवरात तिचा मृतदेह गोणपाटात बांधलेल्या अवस्थेत मिळाला. शिंदखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील, सहाय्यक निरीक्षक प्रशांत गोरावडे व उपनिरीक्षक मिलिंद पवार यांनी मृतदेह रात्रीच धुळे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. खून झाल्याचे प्रथमदर्शनी वाटत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT