The Kharde family had a dispute over this land.
The Kharde family had a dispute over this land.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Sakal Exclusive : वनक्षेत्रावर अतिक्रमण अन्‌ अवैध शस्त्रनिर्मिती; शहरांसह ग्रामीण भाग गुन्हेगारीच्या विळख्यात

कमलेश पटेल

Sakal Exclusive : मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असलेल्या या लहान गावात छोट्याशा कारणावरून गावठी कट्ट्याचा वापर करीत होणारा गोळीबार आणि त्यातून होणारे खून हा प्रकार अतिशय धोकादायक आहे.

सीमावर्ती भागातील गाव पातळीवर वाढत असलेले हे प्रकार मिटविण्याची जबाबदारी पोलिसांची असली, तरी त्याच तुलनेत नागरिकांचीही आहे. या घटनेनिमित्त जिल्हा पोलिस दलाने अवैध हत्यारांविरोधात सर्च ऑपरेशन तीव्र गतीने सुरू करणे आवश्यक झाले.

तसेच, प्रत्येक पोलिस ठाणेनिहाय असलेले गुन्हेशोध पथक (डी.बी.), गावनिहाय कार्यक्षेत्र असलेले अंमलदार, पोलिसपाटील, कोतवाल आणि खबऱ्यांची कार्यक्षमता तपासण्याची वेळ या निमित्ताने आली आहे. (Border towns and rural areas are prone to crime nandurbar news)

मलगावपासून अडीच किलोमीटर अंतरावर पिपलीपाडा हे गाव आहे. येथे राखीव वनक्षेत्र असून, अनेकांना वनपट्टे शासनाने दिले आहेत. काहींनी आपल्याला वनपट्टे मिळतील, या आशेवर शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून जमीन कसायला सुरवात केली. काही वर्षांपूर्वी वन विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून वन जमिनीवर अतिक्रमण करीत शेती करण्याचा प्रकार उघडकीस आला होता.

मध्य प्रदेशातील अनेक कुटुंबे येथे गेल्या काही वर्षांपासून स्थायिक झाले असल्याचे चर्चेत आहे. अशाच एका शासकीय जमिनीच्या वादातून पिपलीपाड्यात एकाच कुटुंबातील सुकराम खर्डे व गणेश खर्डे या दोन परिवारात वाद सुरू होता. जमिनीच्या वादाबाबत नोटीसही मिळाल्याची चर्चा आहे. गुरुवारी (ता. २७) शेतात काम सुरू असताना दोन्ही परिवार आमने-सामने आले. दोन्ही गटांत सुरवातीला शाब्दीक चकमक झाल्यावर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

हाणामारीत तलवारी, विळा, लाकडी दांडके आदी हत्यारांचा बिनदिक्कत वापर करण्यात आला. हाणामारी एवढ्यावरच न थांबता गणेश खर्डे यांच्याकडे बेडिया (ता. पानसेमल, मध्य प्रदेश) येथून आलेल्या सुनील राजेंद्र पावरा या नातेवाइकाने त्याच्याकडील गावठी कट्ट्याने गोळीबार सुरू केला. त्याने दोन राउंड फायर केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दोन्ही गोळ्या अविनाश खर्डे व त्याचे वडील सुखराम खर्डे यांच्या छातीत घुसल्या. अविनाश हा जागीच मृत झाला; तर सुखराम यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या निमित्ताने अवैध हत्याऱ्यांसंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

वनजमिनींवर अतिक्रमण

वनजमिनींवर होणारे अतिक्रमण, आजपर्यंत झालेली प्रचंड वृक्षतोड, अपूर्ण वन कर्मचाऱ्यांमुळे वन विभागाचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे स्थानिक नागरिकांसह मध्य प्रदेशातील अनेक लोक या परिसरात वन जमिनीवर अतिक्रमण करून वास्तव्यास आहेत.

हा संपूर्ण परिसर राखीव वनक्षेत्र म्हणून वन विभागाकडे नोंद आहे. त्याचप्रमाणे मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर असल्याने डोंगराळ व अतिदुर्गम भाग आहे. यामुळे येथे नेहमी शासकीय जमिनीवर अतिक्रमणामुळे सातत्याने वाद होत असतात. याला पायबंद घालण्यास कोणीही पुढाकार घेताना दिसून येत नाही.

अवैध हत्यारांची निर्मिती

मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात अवैध हत्यारांची निर्मिती होत असल्याची चर्चा अनेक वर्षांपासून आहे. पोलिसांनी बहुसंख्य वेळा अशी हत्यारे विक्री करणाऱ्या टोळीला पकडलेही आहे. मात्र, मध्य प्रदेश प्रशासनाला या शस्त्रनिर्मितीच्या उद्योगाला कोणत्याही प्रकारचा पायबंद बसविता आले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे शहादा तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातही अशी हत्यारे सापडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

नजीकच्या मध्य प्रदेश सीमावर्ती भागातून पिस्तूल घेऊन जिल्ह्यात कोणीही बिनदिक्कत व सहज प्रवेश करीत असतील तर हा प्रकार पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. तसेच, डी.बी.चे कर्मचारी, त्या भागातील पोलिसपाटील आणि खबरे यांना सीमावर्ती भागातील अवैध हत्यारांची कसलीही माहिती होत नसेल, हे कोणाच्याही पचनी पडणारे नाही. जिल्हा पोलिसप्रमुखांनी आता अवैध हत्याऱ्यांसंदर्भात कोम्बिंग सर्च ऑपरेशन हाती घेण्याची वेळ आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुख्यमंत्री शिंदेंच्या गडात सर्वात कमी मतदान? जाणून घ्या ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT