Sakal Exclusive : कॅप सेंटरकडे प्राध्यापकांची पाठ; पुणे विद्यापीठाच्‍या गलथान कारभाराची विद्यार्थ्यांना झळ

Many professors are not going to  CAP center for answer sheet checking nashik news
Many professors are not going to CAP center for answer sheet checking nashik newsesakal

Sakal Exclusive : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत विविध परीक्षांच्‍या मूल्‍यांकन प्रक्रियेतील त्रुटी समोर येत आहेत. गंभीर बाब म्‍हणजे उत्तरपत्रिका तपासणीसाठी कॅप सेंटरकडे अनेक प्राध्यापक सोयीस्‍कररित्‍या पाठ दाखवत आहेत.

यातून निकालात गोंधळ उडत असून, याचाच प्रत्‍यय विधी, अभियांत्रिकी शाखेच्‍या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना अनुभवायला आला.

पुणे विद्यापीठाशी संलग्‍न जिल्ह्या‍तील महाविद्यालयातील उत्तरपत्रिका तपासणीसाठी जिल्‍हापातळीवर विद्याशाखानिहाय कॅप सेंटर निश्‍चित केलेले आहेत. (Many professors are not going to CAP center for answer sheet checking nashik news)

या सेंटर्सवर उपस्‍थित राहून संबंधित विद्याशाखेतील विविध महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासणी करणे अपेक्षित आहे. परंतु, प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीसाठी काचकूच करीत असून, कॅप सेंटरकडे सोयीस्‍कररीत्या पाठ फिरवत असल्‍याचे ‘सकाळ’च्‍या निदर्शनात आले आहे.

आधीच कामाचा व्‍याप अधिक असून, त्‍यात अतिरिक्‍त काम नको, अशी भूमिका घेताना प्राध्यापकांकडून उत्तरपत्रिका तपासणीच्‍या कामास टाळाटाळ करण्यात येत आहे. दरम्‍यान, यासंदर्भात केवळ कारवाईचा इशारा दिला जात असताना विद्यापीठाकडून मवाळ भूमिका घेतली जाते. यामुळे दांडीबहाद्दर प्राध्यापकांची हिंम‍मत वाढत असल्‍याचेही बोलले जात आहे. दरम्‍यान, या संपूर्ण प्रकारामुळे निकाल प्रभावित होत असून, विद्यार्थ्यांना मनःस्‍ताप सहन करावा लागत आहे.

उपस्‍थितांना दाखविले गैरहजर

विधी शाखेतील अंतिम वर्षाच्‍या निकालात गोंधळाचा प्रकार समोर आला. यात परीक्षेला उपस्‍थित असलेल्‍या काही विद्यार्थ्यांना निकालात थेट गैरहजर दाखविण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Many professors are not going to  CAP center for answer sheet checking nashik news
Sakal Exclusive : पदवीच्या अंतिम वर्षात 67 टक्के विद्यार्थी ‘फेल’! पदव्युत्तरच्या जागा राहणार रिक्त?

यापूर्वी अनुत्तीर्ण झालेल्‍या काही विद्यार्थ्यांना कठीण विषयांमध्ये चक्‍क भरघोस गुण मिळाल्‍याचा अजब प्रकार समोर आला आहे.

अनुपस्‍थितीसंदर्भात विद्यार्थ्यांनी गदारोळ केल्‍यावर महाविद्यालयांनी विद्यापीठात धाव घेत परीक्षेस संबंधित विद्यार्थी उपस्‍थित असल्‍याचे पुरावे सादर केले असल्‍याचे समजते. मात्र, बुधवारी दुपारपर्यंत निकालात सुधारणा करण्यात आली नसल्‍याचे समजते.

अभियांत्रिकीचा निकाल सायंकाळी व पुन्‍हा सकाळी

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्‍या अंतिम वर्षातील निकालात त्रुटी समोर आल्या आहेत. २० जुलैला सायंकाळी निकाल जाहीर केला होता. मात्र, त्‍यात त्रुटी असल्‍याचे लक्षात आल्‍यावर पुन्‍हा २१ जुलैला सकाळी सुधारित निकाल जाहीर केल्‍याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

या संदर्भात सखोल चौकशी केली असता, पूर्वीच्‍या निकालात प्रात्‍यक्षिक, तोंडी परीक्षांचे गुण जुळवणी करण्याचे राहून गेल्‍याने पुन्‍हा सुधारित निकाल जाहीर करावा लागल्‍याचे सांगण्यात आले.

Many professors are not going to  CAP center for answer sheet checking nashik news
Nashik News : इथे मरणही झाले अवघड...! आदिवासी नागरिकांची करुण कहाणी...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com