Navratri 2023 : येथील आदिमाया, कुलस्वामिनी धनदाईदेवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रद्धेतून मंदिर प्रशासनास सहकार्य करणारे अनेक भाविक आहेत.
देणगीच्या बळावर मंदिर परिसराचा कायापालट झाला असून, वस्तू स्वरूपात देणगी देणारे दानशूरही कमी नाहीत. (Brass flagpole in honor of Adimaya Dhandai Devi dhule navratri news)
धनदाईदेवीच्या मंदिरावर चढविल्या जाणाऱ्या मानाच्या ध्वजासाठी गुजरातमधील बडोदास्थित भाविकाने १५ किलोचा सुमारे आठ फूट लांबीचा पितळी ध्वजस्तंभ उपलब्ध करून दिला आहे. ध्वजस्तंभामुळे आदिमायेच्या मानाच्या ध्वजाची उंची वाढणार आहे.
पितळी ध्वजस्तंभाचे धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष गजमल देवरे यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १८) पूजन करत ध्वजस्तंभ मंदिरावर रोवण्यात आला. राहुल सोनवणे, सुनील शिंदे-मिस्तरी, कर्मचारी किशोर देवरे, सेवेकरी नामदेव गायकवाड, बबलू सोनवणे, सचिन गायकवाड उपस्थित होते.
आदिमाया धनदाईदेवीच्या मंदिरावर चैत्र महिन्यात गुढीपाडवा, नवरात्रोत्सवात घटस्थापनेच्या दिवशी मानाचा ध्वज चढविण्याची परंपरा आहे. नेहमीच धनदाईदेवीस विविध माध्यमांतून मदत करणारे दानशूर, परंतु प्रसिद्धीपासून लांब असलेले गुजरातमधील बडोदास्थित श्रद्धाळू भाविकाने हा पितळी ध्वजस्तंभ उपलब्ध करून दिला आहे. त्याच भाविकाने यापूर्वीच श्रीक्षेत्र धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाकडे रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.
भाविकांची अपार श्रद्धा
धनदाईदेवीस राज्यासह मध्य प्रदेश, गुजरातमधील सुमारे ७७ पेक्षा अधिक कुळांचे भाविक कुलदैवत मानतात. देवी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे. देवीजवळ दर वर्षी श्रद्धेमुळे भाविकांची गर्दी वाढतीच आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळही भाविकांना आवश्यक त्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. मंदिराजवळ भाविकांसाठी मुबलक पाणी, मोफत निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मंदिराजवळील विविध सोयी-सुविधा, विकास पाहून प्रसन्न झालेले भाविक सढळ हाताने मदत करतात. बडोदास्थित भाविकाने यापूर्वीच गावातील रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली असून, गुरुवारी सकाळी नव्याने मानाच्या ध्वजासाठी ध्वजस्तंभ उपलब्ध करून दिल्याने धनदाईदेवीच्या मंदिराची शोभा वाढणार आहे.
''आदिमाया कुलस्वामिनी धनदाईदेवीची शक्ती अपार आहे. देवीचे माहात्म्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश गुजरातमध्येही आहे. देवीवरची श्रद्धा दिवसेंदिवस वाढत असून, देवीच्या आशीर्वादामुळे आज सर्व काही असल्याची माझी धारणा आहे.''-धनदाईदेवीचा एक श्रद्धाळू भाविक, बडोदा (गुजरात)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.