Cupboard broken by thieves. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : पोलीस कॉलनीत उपअभियंत्याकडे घरफोडी

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : देवपूर भागातील वडेल रोडवरील पोलिस कॉलनीत चोरट्यांनी बंद घर फोडून रोकड आणि दागिने लंपास केले. ही घटना मंगळवारी (ता. २९) सकाळी सातच्या सुमारास निदर्शनास आली. (Burglary at Deputy Engineer house in Police Colony dhule crime news)

पोलिस कॉलनीत बांधकाम विभागात उपअभियंता राहुल बापू जाधव यांचे सद्‌गुरू कृपा नामक निवासस्थान आहे. श्री. जाधव यांची मुंबई येथे बदली झाली आहे. त्यामुळे रविवारी ते कुटुंबीयांसह मुंबई येथे गेले.

रक्षाबंधन असल्याने त्यांची पत्नी नाशिकला माहेरी थांबली. बंद घराची संधी साधून चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कपाटाचा दरवाजा तोडून सोन्याचे दागिने आणि १२ ते १५ हजारांची रोकड लंपास केली.

श्री. जाधव यांच्या शेजारील निवृत्त पोलिस विजय गुरव यांच्या लक्षात ही घरफोडी आली. त्यांनी घटनेची माहिती पश्चिम देवपूर पोलिसांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Credit Card Rule: किसान क्रेडिट कार्डचे नियम बदलले! शेतकऱ्यांना आता सहज कर्ज मिळणार; कागदपत्रांची कटकट कमी, RBI चा मोठा निर्णय

सिनेमापलीकडचा माणूस! जीवघेण्या आजाराशी लढणाऱ्या चिमुकलीसाठी अल्लू अर्जुनने पुन्हा म्हटला 'पुष्पा'चा डायलॉग

IND vs AFG, 3rd ODI: प्रसिद्ध कृष्णाच्या ५ विकेट्स, पण अफगाणिस्तानचा कर्णधार एकटा लढला अन् शतकासह भारतासमोर उभं केलं लक्ष्य

Omraje Nimbalkar: उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेंबद्दल ओमराजे पहिल्यांदाच बोलले; कोर्टाच्या निकालावरही दिली प्रतिक्रिया

Udgir News : मुंबई–लातूर–बिदर सुपरफास्टला तीन अतिरिक्त डबे; १७२ अतिरिक्त प्रवाशांना लाभ

SCROLL FOR NEXT