crime news
crime news  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime : घरफोडीचा गुन्हा अवघ्या 8 तासात उघड; अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : सिंधी कॉलनीतील दोन लाख १८ हजार रुपयांची धाडसी घरफोडीच्या गुन्ह्यातील येथील उपनगर पोलिसांनी आठ तासातच तपासचक्र फिरवून संशयितास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Burglary case revealed in just 8 hours criminals in police custody Nandurbar Crime News)

गीता सचानंद गंगवाणी (वय-४० रा. जुनी सिंधी कॉलनी, प्लॉट नंबर- ई-४ ) यांच्या घरातील स्वयंपाक खोलीच्या बंद दरवाजा मंगळवारी (ता. २५) पहाटे चारच्या सुमारास अज्ञातांनी उघडून घरातील कपाटामधून २ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व एक मोबाईल चोरुन नेला. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी उपनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे यांना गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले. पोलिस अधीक्षक श्री. पाटील यांना नामे बुट्टा याने चोरी केलेली असून तो गिरीविहार गेट परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

माहिती त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. भदाणे यांना दिली. श्री. भदाणे यांनी तत्काळ पथक तयार करून संशयितास गिरीविहार गेट परिसरातील एका ढाब्यातून ताब्यात घेतले. त्याने विशाल ऊर्फ बुट्टा विजयकुमार तलरेजा (वय-१९, रा. सिंधी कॉलनी, नंदुरबार ) असे सांगितले.

त्याच्या ताब्यातील ६० हजार ८०० रुपये रोख, १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, सात हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण २ लाख १८ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Manifesto : केवळ घोषणा, अंमलबजावणी नाही! जाहीरनाम्यांपासून ज्येष्ठ नागरिक दूरच असल्याची खंत

MPSC Exam : लोकसेवा आयोगाचं शुद्धीपत्रक, राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

SCROLL FOR NEXT