Cupboard broken by thieves. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : मंदाणे परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; तब्बल 10 ठिकाणी घरफोड्या

दोन दिवसांच्या अंतराने तब्बल दहा ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याच्या घटना रविवारी (ता. ११) सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : शहादा तालुक्याच्या पूर्व भागात मंदाणे, असलोद, गोगापूर गावात अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने तब्बल दहा ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याच्या घटना रविवारी (ता. ११) सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (Burglary in many 10 places in mandane nandurbar crime news )

जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या मंदाणे येथील श्री अष्टभुजा शाकंभरी देवीचा यात्रोत्सव गेल्या काही दिवसांपासून सुरू असून, या घटनांमुळे यात्रेतील व्यवसायिकांसह नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घातला असून, पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत जिल्हा पोलिसप्रमुखांना समक्ष भेटून निवेदनदेखील देण्यात येणार आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्याच्या पूर्व भागात मंदाणे हे मोठ्या लोकसंख्येचे बाजारपेठचे गाव आहे. तसेच मंदाणे येथे ४० ते ४५ गावांतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याशिवाय राज्य सीमा ही अवघ्या चार ते पाच किलोमीटरवर आहे. राज्य महामार्गही या गावावरून गेला आहे.

त्यामुळे व्यावसायिकांची संख्या अधिक आहे. मात्र काही दिवसांपासून चोरट्यांच्या सराईत टोळीने या भागात धुमाकूळ घातला आहे. शनिवारी (ता. १०) रात्री मंदाणे गावात तीन ठिकाणी, पोलिस दूरक्षेत्र असलेल्या असलोद गावात दोन ठिकाणी आणि गोगापूर गावात दोन ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घालत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

मंदाणे गावातील श्रीरामनगरात राहणारे भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या सुनील सुरेश बोरसे यांच्या बंद असलेल्या राहत्या घरात दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी प्रवेश करून गोदरेज कपाटातून ड्रॉवर व लॉकर तोडून त्यातील दागदागिने व रोख पैसे चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती सुनील बोरसे यांच्या वडिलांनी दिली.

त्याच घराच्या मागील बाजूस राहणाऱ्या सरस्वतीबाई रावताळे बाहेरगावी असल्याने त्यांचे घर बंद होते. या बंद घराचाही धारदार कटरने दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाट उघडून साहित्य अस्ताव्यस्त करून मिळेल तो ऐवज लंपास केला. घरमालक बाहेरगावी असल्याने पूर्ण तपशील मिळू शकला नाही.

पोलिस दूरक्षेत्र असलेल्या असलोद गावात दोन ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारत लाखोंचा ऐवज लंपास केला. धर्मा आबा शिंदे अयोध्या येथे गेले आहेत, तर मुलगा पिंपळनेर येथे सत्संग कार्यक्रमास गेला असता त्यांचे घर बंद होते.

याच घरात चोरट्यांनी प्रवेश करून दीड तोळ्याचे दागिने व सुमारे पन्नास हजार रुपये रोख असा मुद्देमाल लंपास झाल्याचे आढळले. याच गावात त्र्यंबक मराठे हेसुद्धा बाहेरगावी गेले असता त्यांचे घर बंद होते. या बंद घरात चोरट्यांनी प्रवेश करून काही प्रमाणात ऐवज चोरीस गेल्याचे सांगण्यात येत आहे.

एकाच रात्री असलोद आणि मंदाणे गावात चोरट्यांनी धुमाकूळ घालत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी व पंचनामा केला.

दरम्यान, या घटनेच्या दोन, तीन दिवस अगोदर बुधवारी रात्री मंदाणे येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या गुरू गजानन ज्वेलर्स दुकानाचे शटर उचकावून वीस ते पंचवीस वयोगटातील चोरट्याने आत प्रवेश करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानमालकाने सुरक्षिततेच्या दृष्टीने नेहमीप्रमाणे रात्री सर्व दागिने घरी नेल्याने चोरट्यांना हाती काही लागले नाही.

या दुकानात चोरटा प्रवेश करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर यात्रेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत राहणारे योगेश सतीलाल जगदेव यांच्या बंद असलेल्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. योगेश जगदेव हे ज्येष्ठ नागरिक आईला बाहेरगावी दवाखान्यात घेऊन गेले होते. या ठिकाणी चोरट्यांनी सुमारे एक तोळ्याचे दागिने लंपास केले. त्याच रस्त्यावरील आदर्श रेडिओ दुकानाचे मालक सुनील सैंदाणे कोळी यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण घरातील कुटुंबीयांना जाग आल्याने चोरटे पसार झाले.

या भागातील गोगापूर या गावातही छोटुलाल हुला पाटील यांच्या बंद असलेल्या घरात प्रवेश करून तीस हजार रुपये रोख आणि सहा ग्रॅमचे दागिने व सागर दिलीप पाटील यांच्या बंद असलेल्या घरात घरात प्रवेश करून काही प्रमाणात ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनांचा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. मंदाणे गावात सध्या यात्रा सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात दुकाने थाटण्यात आली आहेत. मात्र दोन-तीन दिवसांच्या अंतराने तब्बल दहा ठिकाणी चोरीची घटना घडल्याने व्यावसायिकांमध्ये व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यात दररोज चोरीच्या घटना घडत असल्याने चोरट्यांची मोठी टोळी सक्रिय असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी गस्त सुरू करावी आणि शोधमोहीम राबवून या टोळीचा पर्दाफाश करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने चोरट्यांचा बंदोबस्त करण्यास पोलिसांना अपयश येत आहे. निष्क्रिय पोलिस यंत्रणेविषयी नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील कोंढवामध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी ४८ तासांत अटक

SCROLL FOR NEXT