House of Sunanda Rohidas Patil in Kranti Chowk  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : मोहाडी उपनगरात एकाच रात्री चोरीसत्र

शहरातील मोहाडी उपनगरात चोरट्यांनी एकाच रात्रीतून तीन घरांसह वकिलाचे कार्यालय फोडत धाडसी चोरी केली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : शहरातील मोहाडी उपनगरात चोरट्यांनी एकाच रात्रीतून तीन घरांसह वकिलाचे कार्यालय फोडत धाडसी चोरी केली.

रोकडसह सोने व चांदीचे दागिने, असा लाखोंचा ऐवज लंपास केला. (burglary session in single night in Mohadi suburb Dhule Crime News)

मोहाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. क्रांती चौकात सुनंदा रोहिदास पाटील यांच्या घरातून चोरट्यांनी ५० हजारांची रोकड व तीन ते चार ग्रॅम वजनाचे दागिने नेले. समाधान देसले यांच्याकडेही घरफोडी झाली.

चोरांनी ३५ हजार रुपये रोख, दीड तोळे चांदी व सात ग्रॅमचे सोन्याचे दागिने लांबविले. दत्तनगरातील लव पाटील यांच्या घरातून ५० हजारांची रोकड लंपास केली.

तसेच वालचंद बापूजीनगरातील अ‍ॅड. अमोल खैरनार यांचे कार्यालय चोरट्यांनी फोडले. कार्यालयातून लॅपटॉप नेला. घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT