Business fraud by displaying agency bait 
उत्तर महाराष्ट्र

एजन्सीचे आमिष दाखवून व्यावसायिकाची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा

धुळेः साक्री येथील व्यावसायिकाची एजन्सी देत असल्याचे आमिष दाखवून अमरावती येथील एकाने 65 हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी संशयिताविरुद्ध साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

साक्री येथील सचिन रमेश भोसले (वय 40, रा. नेहरूनगर) यांच्याशी संशयित सुनील श्यामराव पवार (रा. शिवाजीनगर, अमरावती) याने विश्वास संपादन करून एजन्सी देत असल्याचे आमिष दाखविले. श्री विठ्ठल एजन्सीज या नावाने अर्ज भरण्यास सांगून जीएसटी क्रमांक व अन्न परवाना घेण्यास भाग पाडले. त्यासाठी दोन लाख 65 हजार रुपये घेऊनही एजन्सी दिली नाही. दिलेल्या पैशांपैकी 65 हजार रुपयांचा जीएसटी व परवान्यासाठी दुरुपयोग करून अनेक किराणा व्यापाऱ्यांशी किराणा मालाचा व्यवहार केला. त्यासाठी एजन्सीच्या (फर्म) नावाने धनादेश दिले. या धनादेशांचा अनादर झाल्याने ते परत आले. त्यातून एजन्सीच्या नावाचा गैरवापर केला. सचिन भोसलेंसह अन्य व्यापाऱ्यांची नियोजनबद्ध फसवणूक केली. या प्रकरणी सचिन भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुनील पवारविरुद्ध साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक ए. यू. अहिरे तपास करीत आहेत. 

खोटी माहिती देत कर्ज घेतले 

देऊर (ता. धुळे) येथील तीन जणांनी बनावट कागदपत्रांद्वारे माहिती सादर करीत 50 हजार रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केली. प्रमिलाबाई बालू देवरे, बालू आत्माराम देवरे, हिरामण बालू देवरे (सर्व रा. देऊर) यांनी तलाठ्यांना खोटी व बनावट माहिती दिली. शेत गट क्रमांक 385/2ब या शेतात 2011 ते 15 या कालावधीत डाळिंब पिकाचा पीक पेरा केला, अशी खोटी नोंद करून सेंट्रल बॅंकेच्या नेर येथील शाखेत दस्तावेजही सादर केले. बनावट प्रकरणाद्वारे 50 हजार रुपये कर्ज काढले. या प्रकरणी सुकदेव आत्माराम देवरे (रा. देऊर, ह. मु. फागणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रमिलाबाई देवरे, बालू देवरे, हिरामण देवरे यांच्याविरुद्ध जिल्हा न्यायालयात तक्रार दिली होती. न्यायालयात कामकाज होऊन चौकशीचे आदेश तालुका पोलिसांना दिले. त्यानुसार तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT